सॅमसंगला टक्कर देण्यासाठी OnePlus Open येतोय भारतात; कंपनीनं टीज केला फोन

OnePlus फोल्डेबल स्मार्टफोन OnePlus Open भारतात येणार हे कंफर्म झालं आहे. गेले अनेक महिने ह्या फोनच्या बातम्या येत आहेत आणि ह्याचे बरेच स्पेसिफिकेशन्स देखील समोर आले आहेत. फोन ऑक्टोबरमध्ये लाँच होणार हे देखील ह्याआधी सांगण्यात आलं होतं, फक्त कंपनीनं ह्याची माहिती दिली नव्हती. आता वनप्लसनं अधिकृतपणे वनप्लस ओपनच्या लाँचची माहिती दिली आहे. फोनची आणखी माहिती समोर आली आहे.

OnePlus Open कंपनीचा फोल्डेबल स्मार्टफोन असेल जो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. OnePlus नं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर फोन टीज केला आहे आणि फोन भारतात येणार हे स्पष्ट केलं आहे. ब्लॅक कलरमध्ये दिसत असलेला OnePlus Open अशाप्रकारे टीज करण्यात आला आहे की ह्याची डिजाइन जास्त दिसत नाही फक्त स्पाइन साइड दिसत आहे. फोनचा रियर किंवा फ्रंट पॅनल समोर येत नाही.

हे देखील वाचा: सॅमसंग, वनप्लस आणि गुगल पिक्सल युजर्सच्या बँक अकाउंटला धोका, सरकारनं दिली वॉर्निंग

OnePlus Open ची संभाव्य किंमत

फोटोमध्ये दिसत आहे की अलर्ट स्लाइडर डावीकडे आहे तर पावर बटन आणि वॉल्यूम रॉकर उजवीकडे आहेत. फोन सेमी फोल्डेड दाखवण्यात आला आहे. कंपनीनं म्हटलं आहे की लवकरच ह्याबाबत आणखी खुलासा केला जाईल. म्हणजे फोनच्या लाँच डेट बद्दल कंपनी घोषणा करू शकते. वनप्लस ओपनची किंमत लीक्स नुसार हा भारतात १,२०,००० रुपयांमध्ये लाँच होऊ शकतो. फोनमध्ये सर्कुलर कॅमेरा मॉड्यूल मिळू शकतो.

हे देखील वाचा: एकच नंबर! १६ हजारांत ६०००एमएएचची बॅटरी आणि १२ जीबी रॅम, Honor Play 50+ येणार का भारतात?

OnePlus Open चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

OnePlus Open चे स्पेसिफिकेशन्स पाहता, ह्यात ७.८२ इंचाचा आतल्या डिस्प्लेसह येऊ शकतो जो OLED पॅनल असेल. बाहेरचा डिस्प्ले ६.३१ इंचाचा असेल. फोनमध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट असेल. हा ऑक्टाकोर Snapdragon 8 Gen 2 SoC सह येईल. त्याचबरोबर १६ जीबी रॅम आणि १ टीबी पर्यंत स्टोरज मिळू शकते. मागे ४८ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा, ४८ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर, आणि ६४ मेगापिक्सलचा टेलीफोटो सेन्सर असेल. फ्रंटला ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळू शकतो. फोनमध्ये ४,८०५ एमएएचची बॅटरी १०० वॉट फास्ट चार्जिंगसह मिळेल.

Source link

OnePlusoneplus foldable phoneoneplus openoneplus open india launchoneplus open priceoneplus open specifications
Comments (0)
Add Comment