आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली OnePlus येतोय; पावरफुल स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ चिपसेटसह येईल बाजारात

वनप्लस लवकरच भारतीय बाजारात आपला फोल्डेबल स्मार्टफोन वनप्लस ओपन सादर करणार आहे. कंपनीच्या ह्या सर्वात पहिल्या फोल्डेबल स्मार्टफोनचा टीजर देखील समोर आला आहे. त्याचबरोबर आता चिनी स्मार्टफोन ब्रँडच्या आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 12 ची माहिती देखील लीक झाली आहे. रिपोर्टनुसार हा फोन डिसेंबरमध्ये लाँच होऊ शकतो. आता आलेल्या लीकमधून कॅमेराच्या माहितीसह महत्वाचे फीचर्स लीक झाले आहेत.

वनप्लस १२ चा कॅमेरा

OnePlus 12 हा कंपनीचा आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन असेल, जो चीनमध्ये डिसेंबरमध्ये लाँच होऊ शकतो, अशी माहिती काही रिपोर्ट्समधून आली आहे. आता प्रसिद्ध टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशननं वनप्लस १२ च्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा केला आहे. फोनच्या कॅमेरा सेटअप बाबत टिपस्टरनं बरीच माहिती दिली आहे. मागे ५० मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स ९६६ सेन्सर मिळू शकतो. ज्यात OIS सपोर्ट मिळेल. आतापर्यंत हा सेन्सर सोनीनं लाँच केला नाही, ज्यात १/१.४ इंच लेन्स असल्याची चर्चा आहे. कॅमेऱ्यात २३मिमी फोकल लेंथ मिळेल आणि हा एफ/१.७ अपर्चरसह येऊ शकतो.

हे देखील वाचा: गोळीगत फास्ट चार्ज होतात हे स्मार्टफोन; किंमत २९,९९९ रुपयांपासून सुरु

मुख्य कॅमेरा वगळता फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड सेन्सर असू शकतो, ज्यात १/२ इंचाचा सेन्सर असल्याचं टिपस्टरनं सांगतील आहे. हा १४मिमी फोकल लेंथसह येईल आणि एफ/२.२ अपर्चर असेल. सेटअपमध्ये तिसरा कॅमेरा ओआयएस सपोर्टसह ६४ मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा असू शकतो. ह्यात १/२-इंचाचा सेन्सर असेल, जो ७०मिमी फोकल लेंथसह येईल आणि अपर्चर एफ/२.५ सांगण्यात आलं आहे. ह्यात ३एक्स ऑप्टिकल झूम मिळू शकतो. OnePlus 12 कॅमेरा मध्ये Hasselblad ऑप्टिमाइजेशन मिळेल.

हे देखील वाचा: नंबर सेव्ह न करता WhatsApp मेसेज कसा पाठवायचा? जाणून घ्या सोपी पद्धत

तसेच आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार, फोन ६.७ इंचाच्या २के अ‍ॅमोलेड एलटीपीओ डिस्प्लेसह येऊ शकतो. ह्यात १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट मिळेल. फ्रंटला फोन ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. डिवाइसमध्ये क्वॉलकॉमचा आगामी स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ प्रोसेसर मिळू शकतो. जोडीला २४जीबी रॅमसह १टीबी स्टोरेज मिळू शकते हा फोन अँड्रॉइड १४ आधारित ऑक्सिजन ओएस सह बाजारात येईल. OnePlus 12 फोन ५,४००एमएएच बॅटरी आणि १०० वॉट फास्ट चार्जिंगसह येऊ शकतो.

Source link

OnePlusoneplus 12 cameraoneplus 12 camera detailsoneplus 12 launchवनप्लस
Comments (0)
Add Comment