‘महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या: (Mahatma Phule Krishi Vidyapeeth, Rahuri)
सहाय्यक प्राध्यापक (फार्म मशीनरी अँड पॉवर इंजिनियरिंग) – ०६ जागा
सहाय्यक प्राध्यापक (इरिगेशन अँड ड्रेनेज इंजिनियरिंग) – ०६ जागा
एकूण पदसंख्या: १२ जागा
शैक्षणिक पात्रता: संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी किंवा पीएचडी असणे आवश्यक आहे. तसेच यूजीसी अंतर्गत येणारी नेट परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. संबधित विषयात अध्यापन आणि संशोधनाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
(वाचा : Exam Tips: सत्र परीक्षेची तयारी करताय? मग ‘या’ टिप्स वापरुन अवघड अभ्यास करा सोपा)
नोकरी ठिकाण: राहुरी, जिल्हा अहमदनगर.
वेतनश्रेणी: ४५ हजार रुपये मासिक
अर्ज पद्धती: ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: असोसिएट डीन, डॉ. अण्णासाहेब शिंदे कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चरल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, राहुरी, जिल्हा अहमदनगर, पिन- ४१३७२२
अर्ज करण्याची शेवटची तारीख: १७ ऑक्टोबर २०२३
या भरती संदर्भात अधिक जाणून घेण्याकरिता ‘महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी’ यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भात सविस्तर अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज कसा करावा: या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे बंधनकारक आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजे १७ ऑक्टोबर आधी सादर करणे गरजेचे आहे. उशिरा आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.
(वाचा: Kolhapur Dakshin Job Fair: कोल्हापूर येथे महारोजगार मेळावा; १०० हून अधिक कपन्यांमध्ये नोकरीची संधी)