मुंबई विद्यापीठाने हिवाळी सत्राच्या परीक्षेचे नियोजन मागील दोन महिन्यापासून सुरू केले होते. त्यानुसार मागील महिन्यात परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर नोव्हेंबरपर्यंतच्या परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. तर, ३ ऑक्टोंबरपासून परीक्षेचे प्रवेशपत्रेही वितरित करण्यात आले आहेत.
हिवाळी सत्राच्या परीक्षा नियमित वेळापत्रकानुसार घेऊन या परीक्षांचे निकालही नियोजित वेळेत जाहीर करण्याचे निर्देश मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी परीक्षा विभागास दिले आहेत. त्यानुसार कुलगुरू, प्रकुलगुरू व कुलसचिव स्वतः याकडे लक्ष देत आहेत.
४३९ परीक्षेच्या तारखा जाहीर :
विद्यापीठ दरवर्षी चार विद्याशाखेच्या ५०० पेक्षा जास्त परीक्षा घेत असते. विद्यापीठाने २०२३-२४ च्या हिवाळी सत्राच्या मानव्य विद्याशाखेच्या एकूण ६८ परीक्षा, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या ६३ परीक्षा, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या २४० परीक्षा व आंतर विद्याशाखेच्या ६८ अशा एकूण ४३९ परीक्षेच्या तारखा विद्यापीठाने जाहीर केल्या आहेत.
विद्यापीठाच्या परीक्षांच्या तारखा :
१. बीकॉम सत्र ५ : २६ ऑक्टोबर २०२३
२. बीए सत्र ५ : ३० ऑक्टोबर २०२३
३. बीएस्सी सत्र ५ : ३० ऑक्टोबर २०२३
४. बीएस्सी आयटी सत्र ५ : २४ नोव्हेबर २०२३
५. बीए एमएमसी सत्र ५ : २४ नोव्हेबर २०२३
६. बीकॉम फिनांशियल मार्केटस, बीकॉम बँकिंग अँड इन्शुरन्स, बीकॉम अकाऊंटिंग अँड फायनान्स, बीकॉम इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट, बीकॉम फिनांशियल मॅनेजमेंट व बीकॉम ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सत्र ५ : १ डिसेंबर २०२३
विद्याशाखा निहाय परीक्षा संख्या :
मानव्य विद्याशाखा व विधी शाखा : ६८
वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा : ६३
विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा : २४०
आंतर विद्याशाखा : ६८
निर्धारित वेळेत निकाल जाहीर करा :
हिवाळी सत्राच्या परीक्षेस प्रारंभ होत असून विद्यार्थ्यांना परीक्षेची तारीख, वेळापत्रक व प्रवेशपत्रे वेळेत दिली आहेत व देण्यात येणार आहेत. तसेच या परीक्षा घेऊन त्याचे मूल्यांकन वेळेत करून निर्धारित वेळेत निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.
– डॉ. प्रसाद कारंडे (प्रभारी संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, मुंबई विद्यापीठ)