महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात विविध पदांची भरती; पगारही आहे भरपूर

MPCB Mumbai Bharti 2023: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई शाखा येथे काही अधिकारी पदांच्या नियुक्तीसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रिये अंतर्गत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामध्ये वातावरणीय वित्त तज्ञ, वातावरणीय शमन तज्ञ, वातावरणीय अनुकूलन तज्ञ, प्रकल्प सल्लागार/अधिकारी या पदांच्या एकूण ०४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच याबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली असून इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून ३० ऑक्टोबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता, वेतन, अर्ज प्रक्रिया याची सविस्तर माहिती पाहूया.

‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती २०२३’ पदे आणि पदसंख्या:
वातावरणीय वित्त तज्ञ – ०१ जागा
वातावरणीय शमन तज्ञ – ०१ जागा
वातावरणीय अनुकूलन तज्ञ – ०१ जागा
प्रकल्प सल्लागार/अधिकारी – ०१ जागा
एकूण रिक्त जागा – ०४

शैक्षणिक पात्रता:
वातावरणीय वित्त तज्ञ – क्लाइमेट फायनान्स इकॉनॉमिक्स/ फायनान्स मधून मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदव्युत्तर पदवी आणि संबधित कामाचा ३ ते ४ वर्षांचा अनुभव.

वातावरणीय शमन तज्ञ – पर्यावरण अभियांत्रिकी (Environmental Engineering), पर्यावरण विज्ञान (Environmental Science), हवामान बदल किंवा आपत्ती (Climate Change or Disaster) यापैकी कोणत्याही एका विषयात मान्यताप्राप्त विद्यापिठातून पदव्युत्तर पदवी आणि संबधित कामाचा २ ते ३ वर्षांचा अनुभव.

वातावरणीय अनुकूलन तज्ञ – पर्यावरण अभियांत्रिकी (Environmental Engineering),पर्यावरण विज्ञान (Environmental Science), स्थापत्य अभियंता (Civil Engineering), शाश्वत विकास (Sustainable Development), हवामान बदल (Climate Change) यापैकी कोणत्याही एका विषयात मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदव्युत्तर पदवी आणि संबधित कामाचा २ ते ३ वर्षांचा अनुभव.

प्रकल्प सल्लागार/अधिकारी – पर्यावरण विज्ञान (Environmental Science), इकोलॉजी (Ecology), जैवविविधता (Biodiversity), रसायनशास्त्र ( Chemistry) यापैकी कोणत्याही एका विषयात मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदव्युत्तर पदवी आणि संबधित कामाचा २ ते ३ वर्षांचा अनुभव.

(वाचा: MPKV Rahuri Bharti 2023: महात्मा फुले कृषी विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक पदांची भरती; आजच करा अर्ज)

वेतनश्रेणी:
वातावरणीय वित्त तज्ञ – १ लाख रुपये
वातावरणीय शमन तज्ञ – ७५ हजार रुपये
वातावरणीय अनुकूलन तज्ञ – ७५ हजार रुपये
प्रकल्प सल्लागार/अधिकारी- ७५ हजार रुपये

नोकरी ठिकाण: मुंबई

वयोमर्यादा : कमाल ४० वर्षे

अर्ज पद्धती: ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० ऑक्टोबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भात अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरतीसाठी थेट अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज कसा करावा: या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. त्याचे सर्व तपशील अधिसूचनेत नमूद केले आहेत.अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.

(वाचा: Exam Tips: सत्र परीक्षेची तयारी करताय? मग ‘या’ टिप्स वापरुन अवघड अभ्यास करा सोपा)

Source link

government jobsJob Newsmaharashtra pollution control boardMaharashtra Pollution Control Board jobsmaharashtra pollution control board recruitmentMPCB Mumbai bharti 2023MPCB Mumbai Recruitment 2023MPCB Recruitment 2023
Comments (0)
Add Comment