‘कोचीन शिपयार्ड’ मध्ये अप्रेंटीस पदासाठी महारभरती; जाणून घ्या सर्व तपशील

Cochin Shipyard Recruitment 2023: ‘सीएसएल’ म्हणजेच कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL) मध्ये अप्रेंटीस पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही जर अप्रेंटीस पदासाठी नोकरी शोधत असाल तर देशाच्या सागरी सेवेत काम करण्याची ही एक उत्तम संधी आहे. या भरती अंतर्गत पदवीधर प्रशिक्षणार्थी आणि तंत्रज्ञ (डिप्लोमा) प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण १४५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच याबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून ३१ ऑक्टोबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन, अर्ज प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया..

‘कोचीन शिपयार्ड लिमिटेड भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
पदवीधर प्रशिक्षणार्थी (Graduate Apprentices) – ७५ जागा
तंत्रज्ञ (डिप्लोमा) प्रशिक्षणार्थी (Technician Diploma Apprentices) – ७० जागा
एकूण रिक्त पदसंख्या १४५

(वाचा: MPKV Rahuri Bharti 2023: महात्मा फुले कृषी विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक पदांची भरती; आजच करा अर्ज )

शैक्षणिक पात्रता:
पदवीधर प्रशिक्षणार्थी – संबधित विषयातील मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतील अभियांत्रिकी पदवी आवश्यक.
तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ उमेदवार – संबधित विषयातील मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतील अभियांत्रिकी डिप्लोमा आवश्यक

वयोमर्यादा: किमान १८ वर्ष

अर्ज पद्धती: ऑनलाईन

वेतन / भत्ता:
पदवीधर प्रशिक्षणार्थी – १२ हजार
तंत्रज्ञ (डिप्लोमा) प्रशिक्षणार्थी – १० हजार २०० रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३१ ऑक्टोबर २०२३.

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता कोचीन शिपयार्ड लिमिटेडची अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भात अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

‘कोचिन शिपयार्ड’च्या या भरतीसाठी थेट अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. अंतिम मुदतीनंतर म्हणजेच ३१ ऑक्टोबर २०२३ नंतर आलेले अर्ज तसेच अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

(वाचा: Exam Tips: सत्र परीक्षेची तयारी करताय? मग ‘या’ टिप्स वापरुन अवघड अभ्यास करा सोपा)

Source link

Apprentices jobscochin shipyard limitedcochin shipyard limited bharti 2023cochin shipyard limited jobsCochin Shipyard Limited Recruitment 2023csl careersCSL recruitment 2023government jobsJob News
Comments (0)
Add Comment