गेल्यावर्षी प्रमाणे आयफोन १५ प्रो मॅक्सनं डीएक्सओमार्कच्या सेल्फी कॅमेरा रँकिंगमध्ये पहिलं स्थान मिळवलं आहे. नवीन आयफोननं सेल्फी कॅमेऱ्याच्या रँकिंगमध्ये १४९ पॉईंट्स मिळवले आहेत. जे गेल्यावर्षीच्या आयफोन १४ प्रो मॅक्स पेक्षा जास्त आहेत.
हे देखील वाचा: फक्त २००० रुपयांच्या मासिक हप्त्यावर मिळवा iPhone 13; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर, असा करा बुकिंग
आयफोन १५ प्रो मॅक्स आणि १४ प्रो मॅक्समधील सेल्फी कॅमेरा
आयफोन १५ प्रो मॅक्स आणि आयफोन १४ प्रो मॅक्स ह्या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये एकच फ्रंट कॅमेरा सेन्सर वापरण्यात आला आहे. ह्यात १२ मेगापिक्सल रिजोल्यूशन असलेला १/३.६ इंचाचा सेन्सर आहे जो ऑटो फोकस आणि ऑप्टिकल इमेज स्टेबिलायजेशनला सपोर्ट करतो. परंतु डीएक्सओमार्कनं आयफोन १५ प्रो मॅक्सच्या कामगिरीचं श्रेय नवीन ए१७ प्रो चिपसेट आणि इमेज सिग्नल प्रोसेसिंग (आयएसपी) ला दिलं आहे.
DxOMark बद्दल
DxOMark ही एक स्वतंत्र बेंचमार्किंग वेबसाइट आहे जी सायंटीफिकली स्मार्टफोन, लेन्स आणि कॅमेऱ्यांची टेस्टिंग करते. सध्याच्या स्मार्टफोन कॅमेरा रँकिंगमध्ये Huawei P60 Pro पहिल्या क्रमांकावर आहे, तर Apple iPhone 15 Pro Max दुसऱ्या आणि Apple iPhone 15 Pro तिसऱ्या क्रमांकावर आहे.
आयफोन १५ प्रो मॅक्सचे स्पेसिफिकेशन
आयफोन १५ प्रो मॅक्समध्ये ६.७ इंचाचा ओएलईडी डिस्प्ले सिरॅमिक शिल्डसह देण्यात आला आहे. कंपनीनं बॉडीयामध्ये टायटेनियमचा वापर केला आहे. हा फोन ए१७ प्रो बायोनिक चिपसेटवर चालतो. सोबत १टीबी पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन आयओएस१७ वर चालतो.
हे देखील वाचा: आयफोन १५ नाही आवडला? मग iPhone 16 साठी व्हा तयार; जबरदस्त फीचर्स झाले लीक
फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात ४८ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि १२ मेगापिक्सलचे अन्य दोन सेन्सर मिळतात. तर फ्रंटला १२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. ह्यात चार्जिंगसाठी यूएसबी टाइप सी पोर्ट मिळतो. तर कनेक्टिव्हिटीसाठी वायफाय, जीपीएस आणि ब्लूटूथ सारखे फिचर मिळतात.