वेळापत्रकानुसार, हिवाळी शाळांसाठी CBSE १० वी आणि १२ वीच्या प्रात्यक्षिक किंवा अंतर्गत मूल्यमापन परीक्षा १४ नोव्हेंबर २०२३ पासून आयोजित केल्या जाणार आहेत. या परीक्षा एक महिन्याच्या कालावधीसाठी घेतल्या जाणार असून, १४ डिसेंबर २०२३ रोजी ही परीक्षा संपणार आहेत. प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण परीक्षा सुरू झाल्याच्या दिवसापासून अपलोड करण्यास सुरुवात होणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षेच्या शेवटच्या तारखेपर्यंत गुण अपलोड करण्याचे काम पूर्ण करावे, असे मंडळाच्या वतीने शाळांना कळविण्यात आले आहे.
याशिवाय, Central Board of Secondary Education ने असेही म्हटले आहे की दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी बोर्डाकडून कोणत्याही बाह्य परीक्षकाची नियुक्ती केली जाणार नाही. शिवाय, बोर्डाकडून प्रात्यक्षिक उत्तरपत्रिकाही दिल्या जाणार नाहीत. मात्र, सीबीएसईला बारावीचीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्ड परीक्षा आयोजित करण्यासाठी आणि त्यांचे मूल्यांकन करण्यासाठी परीक्षक नियुक्त करण्यात येणार असल्याचे बोर्डाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
३० पेक्षा जास्त विद्यार्थी असतील तर निष्पक्ष आणि अचूक मूल्यांकन सुनिश्चित करण्यासाठी प्रात्यक्षिक परीक्षा दिवसभरात विविध सत्रांमध्ये घेण्यात यावी. प्रात्यक्षिक परीक्षांबाबत अधिक माहिती शाळांद्वारे विद्यार्थ्यांना दिली जाईल असे CBSE बोर्डाच्या वतीने सांगण्यात आले आहे. सीबीएसई हे देशातील सर्वात मोठे बोर्ड आहे.
सीबीएसई बोर्डाच्या दहावी-बारावीच्या परीक्षेत दरवर्षी ५० लाखांहून अधिक विद्यार्थी बसतात. लवकरच सीबीएसईच्या वतीने हे वेळापत्रक जाहीर करेल, असे मानले जात आहे. त्यानंतर अधिकृत वेबसाइटवर जाऊन विद्यार्थी ते डाउनलोड करू शकतील. Time Table डाउनलोड करण्यासाठी पायऱ्या अधिकृत वेबसाइटवर दिल्या आहेत.