Videotex 75 इंच QLED TV मध्ये स्लिम आणि बेजल लेस मेटलचा वापर करण्यात आला आहे. त्याचबरोबर टीव्ही मध्ये १.५जीबी रॅम, ८जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. हा टीव्ही LG च्या webOS Hub वर चालतो, त्यामुळे युजर्स मोबाइलवर LG ThinQ अॅप, अॅपलची सर्व्हिसेज देखील अॅक्सेस करू शकतात. हा टीव्ही अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही डिवाइससह चालतो.
हे देखील वाचा: ओप्पो-विवो नव्हे तर ‘हा’ आहे जगातील बेस्ट सेल्फी कॅमेरा फोन; DxOMark रँकिंगमध्ये नंबर वन
ह्यात क्वॉन्टम ल्यूमिनिट+ टेक्नॉलजीचा वापर करण्यात करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर ह्या टीव्हीचा डिस्प्ले ९४% डीसीआय-पी३ ला सपोर्ट करतात. सिनेमा सारखा एक्सपीरियंस युजर्सना मिळवा म्हणून टीव्हीमधील सिनेमा मोडमध्ये डी६५०० कलर टेंपरेचर कॅलीब्रेट करण्यात आला आहे. टीव्हीमधील प्रोसेसर ह्याची पिक्चर क्वॉलिटी आणि एआय क्षमता सुधारतो.
विशेष म्हणजे ह्या टीव्हीला यूएसबी कॅमेरा कनेक्ट करता येतो आणि डॉल्बी ऑडियो साउंडचा सपोर्ट देखील आहे. तसेच रिमोट पीसी फंक्शनच्या मदतीनं हा PC मध्ये देखील रूपांतरित करता येईल. गेमर्ससाठी देखील हा टीव्ही चांगला ठरू शकतो. ह्यात मिळणारा नवीन गेमिंग डॅशबोर्ड, गेमिंग एक्सपीरियंस सुधारण्यासाठी अनेक एन्हान्समेंस्ट घेऊन येतो. एचडीआर १० आणि HLG मोशन सारखे फीचर्स देखली आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल-बँड वाय-फाय, मिराकास्ट आणि ब्लूटूथ ५.० चा सपोर्ट देण्यात आला आहे.
हे देखील वाचा: सॅमसंग, वनप्लस आणि गुगल पिक्सल युजर्सच्या बँक अकाउंटला धोका, सरकारनं दिली वॉर्निंग
वर सांगितल्याप्रमाणे Videotex टीव्ही मॅन्युफॅक्चरर आहे आणि हा टीव्ही त्यांनी ब्रँड्ससाठी तयार केला आहे. आता पाहावं लागेल की हा टीव्ही कोणत्या ब्रँडच्या माध्यमातून लाँच होईल आणि तेव्हाच ह्याची किंमत समोर येईल.