‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन’ मध्ये विविध पदांची भरती; जाणून घ्या कसा करायचा अर्ज

Maharashtra Institute for Transformation Recruitment 2023: ‘मित्र’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन’ या महाराष्ट्र राज्य शासनाच्या अंतर्गत येणार्‍या महत्वपूर्ण सांख्यिकीय संस्थेत भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीद्वारे संचालक-वित्त, संचालक-उपक्रम, संशोधन अधिकारी, अवर सचिव, स्वीय सहायक या पदांच्या एकूण १४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

नुकतीच याबाबत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांकरिता अर्ज ऑनलाईन म्हणजेच ई-मेल पद्धतीने करायचा असून २७ ऑक्टोबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरती प्रक्रियेतील पदे, पदसंख्या, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया याची सर्व माहिती पाहूया.

‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:

संचालक वित्त – ०१ जागा
संचालक उपक्रम – ०१ जागा
संशोधन अधिकारी – ०३ जागा
अवर सचिव – ०४ जागा
स्वीय सहायक – ०५ जागा
एकूण पदसंख्या – १४ जागा

(वाचा: Exam Tips: सत्र परीक्षेची तयारी करताय? मग ‘या’ टिप्स वापरुन अवघड अभ्यास करा सोपा)

शैक्षणिक पात्रता:

  • संचालक वित्त – एकूण सरकारी सेवेतील २५ वर्षांहून काळ कामाचा अनुभव आणि महाराष्ट्र शासनाचे सहसचिव म्हणून निवृत्त
  • संचालक उपक्रम – एकूण सरकारी सेवेतील २५ वर्षांहून काळ कामाचा अनुभव आणि महाराष्ट्र शासनाचे सहसचिव म्हणून निवृत्त
  • अवर सचिव – एकूण सरकारी सेवेतील २० वर्षांहून काळ कामाचा अनुभव आणि महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव दर्जाचे अधिकारी म्हणून निवृत्त
  • संशोधन अधिकारी – एकूण सरकारी सेवेतील २० वर्षांहून काळ कामाचा अनुभव आणि महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयातून संशोधन आणि सांख्यियकी अधिकारी म्हणून निवृत्त
  • स्वीय सहायक – एकूण सरकारी सेवेतील २५ वर्षांहूनकाळ कामाचा अनुभव आणि महाराष्ट्र शासनाच्या सेवेत वरिष्ठ स्वीय सहाय्यक पदावरून निवृत्त
  • अधिक तपशीलवार पात्रता वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज पद्धती: ऑनलाईन ई-मेल द्वारे.

अर्ज करण्यासाठी ई-मेल पत्ता: admin-mitra@maha.gov.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख: २७ ऑक्टोबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता अर्थ व सांख्यिकी संचालनालय विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरतीसंदर्भात सविस्तर अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(वाचा: Cochin Shipyard Recruitment 2023: ‘कोचीन शिपयार्ड’ मध्ये अप्रेंटीस पदासाठी महारभरती; जाणून घ्या सर्व तपशील)

Source link

government jobsJob Newsjobs for retired employeesmaharashtra government jobsMaharashtra Institution for Transformation jobsMaharashtra Institution for Transformation vacancyMITRA Bharti 2023mitra job vacancy 2023MITRA recruitment 2023
Comments (0)
Add Comment