पालिकेच्या लो. टि. म. स. रुग्णालय येथे ‘स्वच्छता निरिक्षक’ पदासाठी भरती; आजच करा अर्ज

BMC Lokmanya Tilak Municipal General Hospital Bharti 2023: ‘सायन हॉस्पिटल’ म्हणून मुंबई मध्ये ओळखल्या जाणार्‍या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती अंतर्गत ‘स्वच्छता निरिक्षक’ पदाच्या एकूण १० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच याबाबत पालिकेने अधिसूचना जाहीर केली आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून २५ ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या पदांसाठीची पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याची सविस्तर माहिती पाहूया.

‘लो. टि. म. स. रुग्णालय, शीव भरती २०२३’ पदे आणि पात्रता:
स्वच्छता निरिक्षक – १० जागा
एकूण रिक्त पदसंख्या – १० जागा

शैक्षणिक पात्रता: उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी तसेच सॅनिटरी इन्स्पेक्टरचा डिप्लोमा किंवा हेल्थ इन्स्पेक्टरचा डिप्लोमा उत्तीर्ण केलेला असावा. या सोबतच संबधित कामाचा ३ ते ५ वर्षांचा अनुभव असावा.

नोकरी ठिकाण: शीव, मुंबई

(वाचा: MITRA Bharti 2023: ‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन’ मध्ये विविध पदांची भरती; जाणून घ्या कसा करायचा अर्ज)

वयोमर्यादा: किमान १८ ते कमाल ३८ वर्षे

वेतनश्रेणी: २५ हजार रुपये

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: लो. टि.म.स. रुग्णालयाच्या आवक / जावक विभागात

अर्ज करण्याची शेवटची तारीख: २५ ऑक्टोबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भात सविस्तर आणि अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया: उमेदवाराने अधिसूचनेत दिलेल्या किंवा पालिकेच्या संकेतस्थळावर उपल्बध असलेल्या अर्जाची प्रिंट काढून तो भरून सोबत आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून तो अर्ज लो. टि.म. स.रुग्णालय, कॉलेज इमारत, तळमजला, रूम नं १४, वरिष्ठ आस्थापना विभागात सादर करावा. तसेच येथे कागदपत्राची पडताळणी केल्यानंतर ७५५ रुपये इतके शुल्क लो. टि.म.स. रुग्णालयाच्या रोखपाल विभागात २० ऑक्टोबर पर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ या कार्यलयीन वेळेत (शनिवार आणि रविवार तसेच सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून) भरावे. त्याची पावती अर्जासोबत जोडून तो अर्ज रुग्णालयाच्या आवक/जावक विभागात २५ ऑक्टोबर पर्यंत सादर करावा.

(वाचा: Sassoon Hospital Pune Bharti 2023: ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे येथे प्राध्यापक पदांची भरती; आजच करा अर्ज)

Source link

bmc jobsbmc lokmanya tilak hospital sion bharti 2023BMC LTMGH recruitmemt 2023government jobsJob NewsLokmanya Tilak Municipal General HospitalLTMGH Bharti 2023sion hospital bharti 2023sion hospital job vacancysion hospital jobs
Comments (0)
Add Comment