आयआयटी जॅम २०२४ साठी अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस; ‘या’ दिवशी मिळणार प्रवेश पत्र, परीक्षेचे वेळापत्रकही केले जाहीर

IIT JAM 2024 Registration: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मद्रास (IIT, Madras) द्वारे मास्टर्ससाठी IIT Joint Admission test for Masters (संयुक्त प्रवेश परीक्षा) साठी घेतल्या जाणार्‍या या प्रवेश परीक्षेचे नोंदणी पोर्टल १३ ऑक्टोबर रोजी बंद केले जाईल. त्यामुळे या अभ्यासक्रमांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र अधिकृत वेबसाइट Jam.iitm.ac.In वरून IIT JAM 2024 साठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याविषयीची सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

अधिसूचनेनुसार, ज्या उमेदवारांनी त्यांची पदवी पूर्ण केली आहे किंवा विद्यापीठ पदवी कार्यक्रमाच्या अंतिम वर्षात आहेत तेच या प्रवेशासाठी अर्ज करू शकतात. भारतीय पदवी धारण केलेले परदेशी विद्यार्थीही IIT JAM 2024 साठी अर्ज करू शकणार आहेत.

Joint Admission test for Masters (JAM 2024) साठी अर्ज केलेल्या उमेदवारांची प्रवेशपत्रे ८ जानेवारी २०२४ रोजी प्रसिद्ध केली जाणार असून विद्यार्थी हे प्रवेशपत्र ऑनलाइन मिळवू शकणार आहेत. JAM 2024 ची परीक्षा ११ फेब्रुवारी रोजी दोन सत्रात घेतली जाईल. रसायनशास्त्र, भूविज्ञान आणि गणितासाठी (सकाळचे सत्र) सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० पर्यंत असेल. तर दुपारचे सत्र गणितीय सांख्यिकी, जैवतंत्रज्ञान, अर्थशास्त्र आणि भौतिकशास्त्राचे २.३० ते ५.३० पर्यंत असेल. या परीक्षांचे निकाल २२ मार्च २०२४ रोजी जाहीर केले जाणार असल्याचे Indian Institute of Technology Madras (IIT Madras) च्या वतीने सांगण्यात आले आहे.

(वाचा : JEE Main 2024: जेईई मेन २०२४ची अर्ज नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू होणार, वयोमर्यादा आणि इतर पात्रता तपशील जाणून घ्या)

अधिसूचनेनुसार, सर्वसाधारण श्रेणीतील उमेदवारांसाठी एका पेपरसाठी अर्ज शुल्क १ हजार ८०० रुपये आणि दोन पेपरसाठी २ हजार ५०० रुपये ठेवण्यात आले आहे. तर महिला, SC, ST किंवा PWD प्रवर्गातील उमेदवारांना एका पेपरसाठी ९०० रुपये आणि दोन पेपरसाठी १ हजार २५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.

JAM 2024 साठी अर्ज करण्यासाठी :

– सर्व उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
– यानंतर रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा.
– वैयक्तिक तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
– यूजर आयडी आणि पासवर्ड तयार करा.
– आता फॉर्म भरा आणि सबमिट करा.
– यानंतर, फॉर्मची एक प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.

(वाचा : India’s Top 10 NIT’s: जेईई परीक्षेनंतर उच्च शिक्षणाच्या प्रवेशही गडबड होण्यापूर्वी, देशातील या सर्वोत्तम १० एनआयटीविषयी जाणून घ्या)

Source link

iit jam 2024iit jam 2024 exam scheduleiit jam 2024 registrationiit jam 24 admit cardiit madrasiit masters entrance examiit masters registrationindian institute of technologyJam.iitm.ac.Injoint admission test for masters
Comments (0)
Add Comment