नेहरू युवा केंद्र व सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण

(जिल्हा संपादक:शैलेश चौधरी)

एरंडोल:तालुक्यातील रवंजे बु। येथील जिल्हा परीषदेच्या शाळेत दि.२४ऑगस्ट २०२१रोजी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी जिल्हा परीषद सदस्य नाना भाऊ महाजन,माजी आमदार डॉ.सतिश अण्णा पाटील,माजी सभापती मोहन भाऊ सोनवणे यांची विशेष उपस्थीती होती.
या कार्यक्रमास येथील सरपंच गोकुळ देशमुख,नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक मुकेश भालेराव,प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.नीता पाटील,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सैंदाने,ग्रामपंचायत सदस्य मुस्तकीम बागवान,माजी सैनिक ज्ञानेश्वर जगताप,गावातील तरुण मंडळी व ग्रामस्थ आदी उपस्थीत होते.या कार्यक्रमात ‘एक व्यक्ती एक झाड, या विचाराने प्रेरित झालेल्या तरुण मंडळींच्या सहकार्याने ५०० रोपांची लागवड यावेळी करण्यात आली.

Comments (0)
Add Comment