उच्च न्यायालयातील या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात सुरुवात झाली असून, उमेदवारांना या भरतीसाठी ऑफलाइन किंवा ऑनलाईन (ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑक्टोबर २०२३ ही आहे. या भारतीविषयी मुंबई उच्च न्यायालय भरती २०२३ संबंधित पदभरतीविषयी अधिक माहिती जाणून घेऊ या.
पदभरतीचा तपशील :
एकूण रिक्त जागा : ५
1. जिल्हा न्यायाधीश (District Judge) : ४ जागा
2. वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश (Senior Civil Judges) : १ जागा
जिल्हा न्यायाधीश (District Judge) आणि वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश (Senior Civil Judges) पदावर निवड होणार्या उमेदवारांना नागपूर, नाशिक, पालघर, सोलापूर अशा जिल्ह्यांमधील कामकाज पहावे लागेल.
पात्रता :
- मुंबई उच्च न्यायालयाच्या भरती अंतर्गत जिल्हा न्यायाधीश आणि वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश पदांसाठी ३० सप्टेंबर २०२० ते ३१ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत सेवानिवृत झालेले किंवा सेवानिवृत होणारे उमेदवार अर्ज करू शकतात.
- जिल्हा न्यायाधीशांच्या संवर्गातील सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांचा जिल्हा न्यायाधीश पदासाठी विचार केला जाईल तर जिल्हा न्यायाधीश आणि वरिष्ठ दिवाणी न्यायाधीशांच्या संवर्गातील सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांचा वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश या पदासाठी विचार केला जाईल.
- स्वइच्छेने सेवानिवृती घेतलेल्या किंवा पदावरून काढललेल्या उमेदवारांना या जागांसाठी अर्ज करता येणार नाही.
(मुंबई उच्च न्यायालय भरती २०२३ साठीचीपात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून या संबंधित सविस्तर माहितीसाठी कृपया भरतीची मुळ जाहिरात वाचा)
अर्जाविषयी :
० मुंबई उच्च न्यायालय भरती २०२३ साठी उमेदवारांना ऑफलाइन किंवा ऑनलाईन (ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.
० ऑफलाइन अर्ज करणार्या उमेदवारांनी मूळ जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या सगळ्या कागदपत्रांसाह अर्ज पुढील पत्यावर पाठवणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : रजिस्ट्रार जनरल, हायकोर्ट ऑफ बॉम्बे, फोर्ट, मुंबई, ४०० ०३२
० ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ई-मेल : rgrp-bhc@bhc.gov.in
० अर्ज करण्याची शेवटची तारीख : २३ ऑक्टोबर २०२३
भरती संबंधित अधिक आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
असा करा अर्ज :
- या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे.
- तुमचा अर्ज वरती दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवा.
- तुमचा अर्ज २३ ऑक्टोबर २०२३ पर्यंत संबंधित पत्त्यावर पाठवणे बंधनकारक आहे.
- ऑफलाइन अर्ज पाठवणार्या, केवळ स्पीड पोस्टच्या माध्यमातून आलेल्या अर्जांचाच विचार केला जाणार आहे.
अधिकृत वेबसाईट : bombayhighcourt.nic.in