नववी आणि दहावी इयत्तेतील दिव्यांग विद्यार्थांसाठी ‘प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती’; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

Scholarship for Handicapped Students: दिव्यांग विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने ‘राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल’द्वारे इयत्ता नववी आणि दहावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ‘प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती (Pre Matric Scholarship)’ जाहीर करण्यात आली आहे. सदर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून या विद्यार्थ्यांना ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.

राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवरील (National Scholarship Portal) सर्व योजनांसाठी लाभार्थ्यांचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे, प्री-मॅट्रिक योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज दिलेल्या कालावधीत ऑनलाइन अर्ज प्रक्रियेच्या माध्यमातून भरावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.

(वाचा : Foreign Education: परदेशी शिक्षणाचे पर्याय अनेक; तुमचा परदेशी शिक्षणाचा मार्ग निवडण्यासाठी परिपूर्ण माहिती)

Pre-Matric Scholarship साठी पात्रतेचे निकष :

1. अनुदानित शाळांमधील इयत्ता ९ वी आणि १० वीचे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.
2. सदर शिष्यवृत्ती एका इयत्तेला एका शैक्षणिक वर्षासाठीच लागू राहील.
3. या शिष्यवृती अंतर्गत अर्ज करणार्‍या उमेदवाराला किमान ४० टक्के किंवा त्याहून अधिक दिव्यांगत्व असावे.
4. शिवाय, सदर विद्यार्थ्याकडे कायद्यानुसार सक्षम अधिकाऱ्याचे दिव्यांगत्वाचे वैध प्रमाणपत्र असणेही आवश्यक आहे.
5. या व्यतिरिक्त, अर्ज करणार्‍या पालकांचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे.

मिळणार एवढ्या रकमेची शिष्यवृती :

सदर शिष्यवृती अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना ९ हजार ते १४ हजार ६०० रुपयांपर्यंत शिष्यवृती मिळणार आहे.

महत्वाच्या तारखा :

1. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत : ३० नोव्हेंबर २०२३
2. शाळास्तरावरील अर्ज पडताळणीचा शेवटचा दिवस : १५ डिसेंबर २०२३
3. जिल्हा स्तर अर्ज पडताळणी मुदत : ३० डिसेंबर २०२३

अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि या शिष्यवृतीसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या

www.scholarships.gov.in

www.depwd.gov.in

(वाचा : Before Confirming Your Admission: कोणत्याही विद्यापीठ किंवा कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करण्यापूर्वी हे नक्की तपासा)

Source link

Government Scholarshiphandicapped studentshandicapped students scholarshipNational Scholarship Portalpre matric scholarship application datePre Matric Scholarship Online ApplicationPre-Matric ScholarshipScholarship for Handicapped Studentswww.depwd.gov.inwww.scholarships.gov.in
Comments (0)
Add Comment