फक्त ८४९ रुपयांमध्ये लाँच झाले itel Earbuds T1 Pro, जाणून घ्या खासियत

भारतीय इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडनं नवीन इअरबड्स लाँच केले आहेत. हे कंपनीचे लेटेस्ट मार्वल एडिशन आहेत. itel Earbuds T1 Pro मध्ये AI ENC देण्यात आलं आहे त्यामुळे कॉलिंग एक्सपीरियंस चांगला मिळतो. कंपनीनं दावा केला आहे की ह्यात सिंगल चार्जमध्ये ३५ तासांचा प्लेबॅक टाइम देण्यात आला आहे. ह्यांची किंमत फक्त ८४९ रुपये आहे. हे डीप ब्लू आणि ग्रे कलरमध्ये विकत घेता येतील आणि रिटेल आउटलेट्सवर खरेदीसाठी उपलब्ध होतील. फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉन सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर हे उपलब्ध होतील की नाही ह्याची माहिती मिळाली नाही.

itel Earbuds T1 Pro चे फीचर्स

ह्याची डिजाइन खूप अस्थेटिक आहे. ह्यात १०मिमी ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत जे बेस खूप चांगला देतात. त्याचबरोबर ऑडियो क्वॉलिटी खूप चांगली मिळते. हे IPX5 वॉटर-रेजिस्टंट आहे त्यामुळे हा पाण्यापासून वाचू शकतो. परंतु ह्यात धुळीपासून संरक्षण मिळत नाही. त्याचबरोबर ह्यात स्मार्ट टच कंट्रोल्स देण्यात आले आहेत जे ऑडियो कंट्रोल आहेत. त्यामुळे व्हॉल्युम कमी जास्त करता येतं तसेच ट्रॅक देखील बदलता येतात.

हे देखील वाचा: Samsung च्या ह्या बजेट फोनवर ६८०० रुपयांचा थेट डिस्काउंट, आता इतक्या किंमतीत मिळेल फोन

ह्यात ब्लूटूथ व्हर्जन ५.३ देण्यात आलं आहे त्यामुळे सहज हा फोनशी कनेक्ट होतो. ह्यांची रेंज १० मीटर पर्यंत आहे. ह्यातील प्रत्येक इअरबड ३० एमएएच बॅटरीसह येतात. त्याचबरोबर केस मध्ये ५०० एमएएचची बॅटरी क्षमता आहे. हे बड्स सिंगल चार्जवर किती वेळ चालतात हे मात्र कंपनीनं सांगितलेलं नाही. ह्यात टाइप-सी सपोर्ट देण्यात आला आहे. itel T1 Pro मध्ये इन-इअर डिटेक्शन आणि व्हॉइस असिस्टंट देण्यात आलं आहे जो युजरचा ओव्हरऑल एक्सपीरियंस समृद्ध करतो. हे स्टेम डिजाइनसह येतात.

हे देखील वाचा: Samsung ला टक्कर देण्यासाठी भारतात येत आहे OnePlus Open, लाँच डेट ठरली

Source link

itelitel earbudsitel earbuds t1 proitel earbuds t1 pro launchitel earbuds t1 pro priceitel earbuds t1 pro price in india
Comments (0)
Add Comment