शाओमीचा सर्वात शक्तिशाली फोन येतोय बाजारात; Xiaomi 14 Pro ची डिजाईन, स्पेसिफिकेशन्स लीक

चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi लवकरच Xiaomi 14 आणि 14 Pro लाँच करू शकते. हे स्मार्टफोन्स गेल्यावर्षीच्या शेवटी आलेल्या शक्तिशाली Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro ची जागा घेतील. आता आलेल्या लिक्समधून समोर आलं आहे की Xiaomi 14 Pro मध्ये फ्लॅट डिस्प्ले आणि क्वॉड रियर कॅमेरा यूनिट मिळू शकतो.

माहिती झाली लीक

टिप्सटर Steve Hemmerstoffer (@OnLeaks) नं सांगितलं आहे की या स्मार्टफोनमध्ये Xiaomi 13 Pro पेक्षा अनेक बदल पाहायला मिळू शकतात. ह्यात फ्लॅट डिस्प्लेमध्ये फ्रंट कॅमेऱ्यासाठी होल पंच कटआउट असेल. सोबत ६.६ इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले २के रिजॉल्यूशन आणि १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह मिळू शकतो. ह्याच्या मागे क्वॉड कॅमेरा सेटअप असण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा: Samsung ला टक्कर देण्यासाठी भारतात येत आहे OnePlus Open, लाँच डेट ठरली

Xiaomi 14 Pro मध्ये प्रोसेसर म्हणून क्वॉलकॉमचा आगामी स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ चिपसेट मिळू शकतो. ह्यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळू शकतो. ह्यात ४,८६० एमएएचची बॅटरी १२० वॉट वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळू शकते. ह्या स्मार्टफोनमध्ये ड्युअल स्पिकर्स दिले जाऊ शकतात. फोनचा आकार १६१.६ x ७५.३ x ८.७ मिमी असू शकतो.

हे देखील वाचा: Samsung ला टक्कर देण्यासाठी भारतात येत आहे OnePlus Open, लाँच डेट ठरली

जुन्या शाओमी १३ प्रो चे स्पेसिफिकेशन्स

कंपनीनं ह्या वर्षाच्या सुरुवातीला शाओमी १३ प्रो भारतीय बाजारात लाँच केला होता. फोनचा १२ जीबी रॅम व २५६जीबी स्टोरेज व्हेरिएंट ७९,९९९ रुपयांमध्ये आला आहे. ६.७३ इंचाचा २के ओएलईड डिस्प्ले १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह येतो. ह्यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात ५० मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स९८९ सेन्सर मुख्य आहे. ह्या स्मार्टफोनची बॅटरी ४,८२० एमएएच आहे जी १२० वॉट फास्ट चार्जिंग आणि ५० वॉट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.

Source link

Xiaomixiaomi 14 proxiaomi 14 pro cameraxiaomi 14 pro launchxiaomi 14 pro pricexiaomi 14 pro price in india
Comments (0)
Add Comment