या भरती अंतर्गत ‘अभियांत्रिकी कार्यकारी प्रशिक्षणार्थी’ या पदाच्या ४०० हून अधिक रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच या संदर्भात अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून २० ऑक्टोबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता, वयोमार्यादा आणि इतर सविस्तर माहिती पाहूया.
‘नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
पदाचे नाव -अभियांत्रिकी कार्यकारी प्रशिक्षणार्थी
विभाग आणि पदे
इलेक्ट्रिकल – १२० जागा
मेकॅनिकल – २०० जागा
इलेक्ट्रॉनिक्स आणि इंस्ट्रूमेंटल – ८० जागा
सिव्हिल – ३० जागा
मायनिंग – ६५ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ४९५ जागा
(वाचा: BEML Recruitment 2023: ‘बीईएमएल’ मध्ये ‘गट क’च्या १०० हून अधिक पदांची भरती; जाणून घ्या सर्व तपशील)
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबधित अभियांत्रिकी शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
वयोमर्यादा : कमाल २७ वर्षे (राखीव प्रवर्गास शासनाच्या नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सवलत आहे.)
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २० ऑक्टोबर २०२३
अर्ज शुल्क : ३०० रुपये (राखीव प्रवर्गास अर्ज शुल्क नाही)
या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता ‘एनटीपीसी’ च्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भात अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजे २० ऑक्टोबर २०२३ आधी सादर करणे गरजेचे आहे. उशिरा आलेले तसेच अपूर्ण राहिलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
(वाचा: BMC LTMGH Bharti 2023: मुंबईच्या सायन हॉस्पिटलमध्ये ‘स्वच्छता निरिक्षक’ पदासाठी भरती; आजच करा अर्ज)