एरंडोल नगर पालिकेकडून मोकाट गुरांच्या मालकांवर कारवाई व वृक्ष लागवड,संवर्धनाचे आवाहन

(जिल्हा संपादक:शैलेश चौधरी)

एरंडोल:येथे नगरपालिकेकडून शहरात माझी वसुंधरा अभियान २०२० तसेच वृक्ष लागवड मोहीम २०२१ नुसार शहराचे हरीत आच्छादन वाढावे व हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी ठिकठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली आहे.
मात्र काही घरमालक आपली गुरे वृक्ष लागवड केलेल्या ठिकाणी चरण्यासाठी बांधून ठेवतात.करीता गुरे मालकांना नगर पालिका कर्मचाऱ्यांनी स्वतः घरी जाऊन उचित समज ही देण्यात आली होती.मात्र समज दिल्या नंतर काहीही न ऐकता नियमितपणे गुरे खुल्या भुखंडामध्ये बांधून आपल्या कामास निघून जायचे.परीणामी गुरांकडून लागवड केलेल्या वृक्षांची नासधूस व्हायची.करीता एकूण दोन गुरे मालकांवर नगर पालिकेने प्रत्यक्ष कारवाई करून दंड ठोठावला असून दंड ठोठावल्या नंतर त्यांनी गुरे न.पा जागेत बांधणे बंद केले आहे.यापुढे जे नागरीक आपली गुरे/ढोरे अश्या प्रकारे खुल्या भुखंडा मध्ये बांधतील त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल.तसेच त्यांच्या कडून संपूर्ण नुकसान भरपाई वसूल करण्यात येईल तसेच प्रत्येक कुटुंबाने एक वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन व संगोपन करावे.आपले गाव सुंदर व हरीत करण्यास हातभार लावावे असे आवाहन नगरपालिकेकडून यावेळी करण्यात आले.

Comments (0)
Add Comment