महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत १५३ जागांसाठी पदाभरती, आजच करा करा अर्ज

MSC Bank Recruitment 2023: महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडने प्रशिक्षणार्थी लिपिक आणि इतर पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार MSC बँकेच्या अधिकृत वेबसाइट mscbank.com द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. सदर भरती अंतर्गत एकूण १५३ पदांवर भरतीद्वारे नियुक्त्या करण्यात येणार आहेत.

अधिसूचनेनुसार, भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया १० ऑक्टोबर रोजी सुरू झाली असून, ३० ऑक्टोबर २०२३ हा अर्ज नोंदणीच शेवटचा दिवस असेल. उमेदवारांनी अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर तपशील तपासावे आणि त्यानुसार अर्ज करावा. एमएससी बँकेच्या या भरतीमध्ये चुकीचा भरलेला फॉर्म स्वीकारला जाणार नाही.

पदभरतीचा तपशील :

एकूण रिक्त जागा : १५३

प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी : ४५ जागा
प्रशिक्षणार्थी लिपिक १०७ जागा : १०७ जागा
कनिष्ठ अधिकारी श्रेणीमध्ये स्टेनो टायपिस्ट : १ जागा

निवड प्रक्रिया :

0 ऑनलाइन लेखी परीक्षा, वैयक्तिक मुलाखत किंवा कौशल्य चाचणीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.
0 लेखी परीक्षा फक्त इंग्रजी भाषेत असेल.
0 वैयक्तिक मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट होण्यासाठी, उमेदवारांना पात्रता गुण म्हणून एकूण गुणांच्या किमान ५० टक्के म्हणजेच १०० गुण प्राप्त करणे अनिवार्य असेल.

(वाचा : NEET SS 2023 Result: नीट एसएस २०२३ परीक्षेचा निकाल जाहीर; या लिंकवरून डाउनलोड करा रिझल्ट)

अर्ज शुल्काविषयी :

  • प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी आणि लघुलेखक टंकलेखक यांच्या अर्जाची फी १ हजार ७७० रुपये आहे.
  • तर, प्रशिक्षणार्थी लिपिकासाठी अर्ज शुल्क १ हजार १८० रुपये असेल.
  • अर्ज शुल्काचा भरणा केवळ ऑनलाइन पद्धतीने (डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, IMPS, कॅश कार्ड/मोबाइल वॉलेट) स्वीकारला जाईल.

MSC Bank Bharti 2023 पदभरतीमध्ये अर्ज करण्यासाठी :

– सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
– यानंतर रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा.
– वैयक्तिक तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
– यूजर आयडी आणि पासवर्ड तयार करा.
– यानंतर लॉग इन करा आणि फॉर्म भरा.
– आता कागदपत्रे अपलोड करा.
– यानंतर फी भरा आणि सबमिट करा.
– आता फॉर्मची एक प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.

(वाचा : BDL Recruitment 2023 : भारत डायनामिक्स मध्ये ‘या’ पदावर Apprenticeship ची संधी; ११९ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात)

Source link

Banking Jobsjobs for banking professionalsjobs in banksMaharashtramaharashtra state bankmaharashtra state co-operative bank limitedmsc bank bharti 2023msc bank recruitment 2023mscb bharati 2023mscbank.com
Comments (0)
Add Comment