नुकतीच याबाबत अधिसूचना जाहीर झाली असून या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून १७ नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन याबाबत सविस्तर माहिती पाहूया.
‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्था भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या: (Defence Research and Development Organisation)
शास्त्रज्ञ सी – २७ जागा
शास्त्रज्ञ डी – ०८ जागा
शास्त्रज्ञ ई – १४ जागा
शास्त्रज्ञ एफ – ०२ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ५१ जागा
(वाचा: NTPC Recruitment 2023: इंजिनियर्ससाठी महारभरती! ‘एनटीपीसी’ मधील ‘या’ जागांसाठी तातडीने करा अर्ज)
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता प्रत्येक पदाच्या आवश्यकतेनुसार असून पदाच्या त्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. जाहिरातीची लिंक खाली नमूद केली आहे.
वयोमर्यादा: ‘शास्त्रज्ञ सी’ या पदासाठी कमाल वयोमर्यादा ४० वर्षे तर अन्य पदांसाठी कमाल वयोमर्यादा ५० वर्ष.
अर्ज पद्धत्ती: ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: २१ ऑक्टोबर २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख: १७ नोव्हेंबर २०२३
वेतन:
शास्त्रज्ञ सी – ६७ हजार ७००
शास्त्रज्ञ डी – ७८ हजार ८००
शास्त्रज्ञ ई – १ लाख २३ हजार १००
शास्त्रज्ञ एफ – १ लाख ३१ हजार १००
या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्था’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भात अधिकृत जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
(वाचा: Art Academy Goa Recruitment 2023: संगीत क्षेत्रात संधी! कला अकादमी गोवा येथे विविध पदांची भरती; आजच करा अर्ज)