चांगला कॅमेरा फोन शोधत असलेल्या लोकांसाठी गुडन्यूज; Vivo Y200 येतोय भारतात

विवो एक दमदार कॅमेरा फोन लाँच करण्याची तयारी करत आहे, ज्याचे नाव Vivo Y200 असेल होगा. हा फोन २३ ऑक्टोबर २०२३ ला दुपारी १२ वाजता लाँच केला जाईल. हा एक व्हर्च्युअल लाँच इव्हेंट असेल. कंपनीचा दावा आहे की हा स्टायलिश आणि अ‍ॅस्थेटिक डिजाइन असलेला फोन असेल, ज्यात पावरफुल कॅमेरा सेटअप दिला जाईल.

कंपनीनुसार फोनमध्ये ऑरा लॉइटचा सपोर्ट दिला जाईल. विशेष म्हणजे याआधी Vivo V29 मध्ये ऑरा लॉइट देण्यात आली होती, जी नॉर्मल फ्लॅश लाइटच्या तुलनेत जास्त चमकदार असते, आणि रात्रीच्या प्रकाशात खूप चांगले फोटो क्लिक होतात. ही एक कलर चेंजिंग ऑरा लाइट असेल जी तुम्हाला डिस्को लाइटिंग प्रमाणे फोटो आणि व्हिडीओ जनरेट करण्यास मदत करेल. एकंदरीत कंपनी ज्याप्रकारे दावा करत आहे, त्यानुसार Vivo Y200 एक शानदार कॅमेरा फोन असू शकतो.

हे देखील वाचा: Apple चं देतंय iPhone 15 वर हजारोंची सूट; Mac, iPad आणि Airpod देखील मिळणार स्वस्तात

Vivo Y200 ची संभाव्य किंमत

Vivo Y200 स्मार्टफोन दोन कलर ऑप्शनमध्ये लाँच केला जाऊ शकतो. ज्यात गोल्ड आणि ग्रीन व्हेरिएंटचा समावेश असेल. हा फोन भारतीय बाजारात २४,००० रुपयांच्या बेस प्राइसमध्ये लाँच केला जाऊ शकतो. फोन ८जीबी रॅम आणि १२८जीबी स्टोरेज ऑप्शनमध्ये लाँच केला येईल.

Vivo Y200 चे स्पेसिफिकेशन्स

फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन Snapdragon 4 Gen 1 चिपसेट दिली जाईल. हा डिवाइस अँड्रॉइड १३ आधारित Funtouch OS वर चालेल. फोन ६४ मेगापिक्सलच्या सपोर्टसह येईल, सोबत २ मेगापिक्सलचे सेन्सर मिळतील. तर फ्रंटला १६ मेगापिक्सलचा सेन्सर दिला जाऊ शकतो. फोनमध्ये ४८०० एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते, जी ४४ वॉट वॉयर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. ह्या हँडसेटचे वजन १९० ग्राम आणि जाडी ७.६९मिमी असेल.

हे देखील वाचा: ३२ दिवस टिकेल ह्या फोनची बॅटरी; फक्त ६,४९९ रुपयांमध्ये ६.६ इंचाचा डिस्प्ले

Source link

vivovivo y200vivo y200 indiavivo y200 india launchvivo y200 launchvivo y200 price in indiaविवोविवो वाय२००
Comments (0)
Add Comment