एअरपोर्ट्स अ‍थॉरिटी ऑफ इंडिया मध्ये महाभरती! ४०० हून अधिक उमेदवारांना मिळणार रोजगार

Airport Authority of India Recruitment 2023: भारताच्या विमानसेवेत काम करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. एअरपोर्ट्स अ‍थॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय विमानतळ प्राधिकरण ( Airport Authority Of India) येथे महाभारती सुरू आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत ‘कनिष्ठ कार्यकारी – एअर ट्रॅफिक कंट्रोल’ या पदाच्या एकूण ४९६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

नुकतीच याबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली असून या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून ३० नोव्हेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची आहे. तेव्हा या भरती मधील पदे, पात्रता, वेतन आणि अर्जप्रक्रिया याची सविस्तर माहिती पाहूया.

‘भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
कनिष्ठ कार्यकारी -एअर ट्रॅफिक कंट्रोल : ४९६ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ४९६ जागा

शैक्षणिक पात्रता:
कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षणसंथेतून/ विद्यापीठातून भौतिकशास्त्र आणि गणित विषय घेऊन विद्यान शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षणसंथेतून/ विद्यापीठातून अभियांत्रिकी शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. यामध्ये भौतिकशास्त्र आणि गणित विषय कोणत्याही एका सत्र परीक्षेला निवडणे गरजेचे आहे. .
(अन्य पात्रतेचे निकष अधिसूचनेत नमूद केले आहेत. सविस्तर अधिसूचनेची लिंक खाली नमूद केली आहे.)

(वाचा: NTPC Recruitment 2023: इंजिनियर्ससाठी महारभरती! ‘एनटीपीसी’ मधील ‘या’ जागांसाठी तातडीने करा अर्ज)

वयोमर्यादा: कमाल वयोमर्यादा २७ वर्ष. कमाल वयोमर्यादेत ओबीसी प्रवर्गाला ३ वर्षांची तर एससी/ एसटी प्रवर्गाला ५ वर्षांची सवलत आहे.

अर्ज पद्धती: ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख: १ नोव्हेंबर २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० नोव्हेंबर २०२३

वेतन: वार्षिक अंदाजे १३ लाख रुपये

या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता ‘भारतीय विमानतळ प्राधिकरण’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भात अधिकृत जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज कसा करावा: उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. अर्जसोबत आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे. अपूर्ण तसेच उशिरा आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

(वाचा: Art Academy Goa Recruitment 2023: संगीत क्षेत्रात संधी! कला अकादमी गोवा येथे विविध पदांची भरती; आजच करा अर्ज)

Source link

AAI bharti 2023AAI Recruitment 2023Airport Authority Of IndiaAirport Authority Of India jobsAirport Authority Of India recruitment 2023airport authority of india vacancy 2023government jobsjob for bsc graduatesjob for engineersJob News
Comments (0)
Add Comment