एअर इंडिया मध्ये सुवर्णसंधी! विविध ६१ पदांसाठी थेट मुलाखत घेऊन करणार भरती

Air India Airport Services Limited: ‘एआयएटीएसएल’ म्हणजेच एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड यांच्या अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीमध्ये ड्युटी मॅनेजर, ड्युटी ऑफिसर, ज्युनियर ऑफिसर, सीनियर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह ही आणि यासारखी विविध संवर्गातील ६१ पदे भरली जाणार आहेत.

नुकतीच याबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली असून इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी थेट मुलाखतीस उपस्थित राहायचे आहे. या उमेदवारांची मुलाखत घेऊन संबधित पदांसाठी नियुक्ती केली जाणार आहे. तेव्हा या भरतीप्रक्रियेतील एकूण पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन, मुलाखतीच्या तारखा याबाबत सविस्तर माहिती पाहूया.

‘एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
ड्युटी मॅनेजर – ०१ जागा
ड्युटी ऑफिसर – ०१ जागा
ज्युनियर ऑफिसर टेक्निकल – ०१ जागा
सीनियर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह – ०३ जागा
कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह – ०६ जागा
ज्युनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह – १२ जागा
सीनियर रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव्ह – ०३ जागा
रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव्ह – ०३ जागा
युटिलिटी एजंट रॅम्प ड्रायव्हर – ०६ जागा
हॅंडीमॅन- १५ जागा
हॅंडीवुमन – १० जागा
एकून रिक्त जागा – ६१

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता प्रत्येक पदाच्या आवश्यकतेनुसार वेगळी असून त्याबाबत सविस्तर माहिती अधिसूचनेत दिलेली केली आहे. अधिसूचनेची लिंक नमूद केली आहे.

(वाचा: NTPC Recruitment 2023: इंजिनियर्ससाठी महारभरती! ‘एनटीपीसी’ मधील ‘या’ जागांसाठी तातडीने करा अर्ज)

वेतन:
ड्युटी मॅनेजर – ४५ हजार
ड्युटी ऑफिसर – ३२ हजार २००
ज्युनियर ऑफिसर टेक्निकल – २८ हजार २००
सीनियर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह – २४ हजार ६४०
कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह – २३ हजार ६४०
ज्युनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह – २० हजार १३०
सीनियर रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव्ह – २४ हजार ६४०
रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव्ह – २३ हजार ६४०
युटिलिटी एजंट रॅम्प ड्रायव्हर – २० हजार १३०
हॅंडीमॅन – १७ हजार ८५०
हॅंडीवुमन – १७ हजार ८५०

नोकरी ठिकाण: राजकोट

निवड प्रक्रिया: मुलाखतीद्वारे

मुलाखतीच्या तारखा:
ड्युटी मॅनेजर, ड्युटी ऑफिसर, ज्युनियर ऑफिसर टेक्निकल, सीनियर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह, ज्युनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह या पदांसाठीच्या मुलाखती ३० आणि ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० या वेळेत होतील.

सीनियर रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव्ह, रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट रॅम्प ड्रायव्हर, हॅंडीमॅन, हॅंडीवुमन या पदांसाठीच्या मुलाखती ०१, ०२, ०३ नोव्हेंबर २०२३ रोजी ९.३० ते दुपारी १२.३० या वेळेत होतील.

मुलाखतीचा पत्ता: इंजिनियरिंग अँड मेंटेनन्स वर्कशॉप, राजकोट आंतरराष्ट्रीय विमानतळासमोर, हिरासर, राजकोट, गुजरात ३६३५२०.

या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड’ च्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भात सविस्तर अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(वाचा: AAI Recruitment 2023: एअरपोर्ट्स अ‍थॉरिटी ऑफ इंडिया मध्ये महाभरती! ४०० हून अधिक उमेदवारांना मिळणार रोजगार)

Source link

AI AIRPORT SERVICES LIMITED vacancy 2023aiasl recruitment 2023AIATSL bharti 2023aiatsl recruitment 2023air india air transport services limited jobsAir India AIRPORT SERVICES LIMITED jobsair india jobs 2023air india recruitment 2023government jobsJob News
Comments (0)
Add Comment