पुण्यातील नामांकित ‘एफटीआयआय’ मध्ये विविध पदांसाठी भरती; आजच करा अर्ज

Film and Television Institute of India Recruitment 2023: मनोरंजन विश्वातील नामांकित प्रशिक्षण संस्थापैकी एक समजल्या जाणार्‍या ‘एफटीआयआय’ (Film and Television Institute of India) म्हणजेच चित्रपट आणि दूरदर्शन संस्था, पुणे येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीद्वारे विविध विषयांचे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, चित्रपट संशोधन अधिकारी, प्रॉडक्शन सुपरवायजर, पोस्ट-प्रॉडक्शन सुपरवायजर, सुरक्षा अधिकारी या पदांच्या एकूण ३१ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

या भरती बाबत नुकतीच अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. हे अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचे असून ३० ऑक्टोबर ही अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती पाहूया.

‘एफटीआयआय भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
प्राध्यापक – ०५ जागा
सहयोगी प्राध्यापक – १० जागा
सहाय्यक प्राध्यापक – १२ जागा
चित्रपट संशोधन अधिकारी – ०१ जागा
प्रॉडक्शन सुपरवायजर – ०१ जागा
पोस्ट-प्रॉडक्शन सुपरवायजर – ०१ जागा
सुरक्षा अधिकारी – ०१ जागा
एकूण पदसंख्या: ३१ जागा

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता प्रत्येक पदाच्या आवश्यकतेनुसार भिन्न असून त्याचे सविस्तर तपशील अधिसूचनेत नमूद केले आहेत. अधिसूचनेची लिंक खाली जोडली आहे.

(वाचा: Art Academy Goa Recruitment 2023: संगीत क्षेत्रात संधी! कला अकादमी गोवा येथे विविध पदांची भरती; आजच करा अर्ज)

वयोमर्यादा: सुरक्षा अधिकारी वगळता सर्व पदांसाठी कमाल वयोमर्यादा ६३ वर्षे आहे. तर सुरक्षा अधिकारी पदासाठी कमाल वयोमर्यादा ६० वर्षे आहे.

वेतन:
प्राध्यापक – १ लाख ४३ हजार ३९६
सहयोगी प्राध्यापक – १ लाख २४ हजार ६३७
सहाय्यक प्राध्यापक – १ लाख ०५ हजार ३३
चित्रपट संशोधन अधिकारी – १ लाख ०५ हजार ३३
प्रॉडक्शन पर्यवेक्षक – १ लाख ०५ हजार ३३
पोस्ट-प्रॉडक्शन पर्यवेक्षक – १ लाख ०५ हजार ३३
सुरक्षा अधिकारी – १ लाख ०५ हजार ३३

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती: ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० ऑक्टोबर २०२३

या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘एफटीआयआय’ च्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भात सविस्तर अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरतीकरिता थेट अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्जामध्ये आवश्यक ती कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे. अर्ज भरण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. अपूर्ण राहिलेले किंवा देय तारखेनंतर म्हणजे ३० ऑक्टोबर सायंकाळी ५.०० नंतर प्राप्त झालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

(वाचा: AIATSL Recruitment 2023: एअर इंडिया मध्ये सुवर्णसंधी! विविध ६१ पदांसाठी थेट मुलाखत घेऊन करणार भरती)

Source link

film and television institute of india (ftii)ftii job vacancy 2023FTII Pune Bharti 2023FTII pune jobsFTII Pune Recruitment 2023government jobsJob NewsPune Jobs
Comments (0)
Add Comment