या पदासाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करायचा असून १० नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या पदांसाठीची पात्रता, वेतन, अर्जप्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती पाहूया.
‘मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२३’ पदे आणि पदसंख्या:
सहाय्यक व्यवस्थापक – १५ जागा
एकूण पदसंख्या – १५
शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त शिक्षणसंथेतून ७० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करून सिव्हिल इंजिनियरिंगचो बीई/ बी-टेक किंवा त्या समकक्ष पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संबधित कामाचा किमान ६ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे.
नोकरी ठिकाण: मुंबई
(वाचा: AIATSL Recruitment 2023: एअर इंडिया मध्ये सुवर्णसंधी! विविध ६१ पदांसाठी थेट मुलाखत घेऊन करणार भरती)
वेतनश्रेणी: १ लाख १० हजार ८२८
वयोमर्यादा: कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे आणि कमाल वयोमर्यादेत ओबीसी प्रवर्गास ३ वर्षे तर एससी/ एसटी प्रवर्गास ५ वर्षे सवलत आहे.
अर्ज पद्धती: ई-मेल द्वारे
अर्ज पाठविण्याचा पत्ता: career@mrvc.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख: १० नोव्हेंबर २०२३
या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन’ च्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भात सविस्तर अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच इ-मेल द्वारे करायचा आहे. अर्जामध्ये आवश्यक ती कागदपत्रे जोडणे बंधनकरक आहे. अर्ज भरण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. अपूर्ण राहिलेले किंवा देय तारखेनंतर म्हणजे १० नोव्हेंबर २०२३ नंतर प्राप्त झालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
(वाचा: FTII Pune Bharti 2023: पुण्यातील नामांकित ‘एफटीआयआय’ मध्ये विविध पदांसाठी भरती; आजच करा अर्ज)