नॉर्ड ३ आवडला? मग आता येतोय OnePlus Nord 4; लाँचपूर्वीच लीक झाले स्पेसिफिकेशन्स

OnePlus आपल्या एका नवीन Ace सीरीज स्मार्टफोनवर काम करत आहे. OnePlus Ace चीनी बाजारात सर्वात लोकप्रिय मिड-रेंज स्मार्टफोन सीरीज पैकी एक आहे. OnePlus Ace 2 Pro खासकरून चीनमध्ये खूप लोकप्रिय आहे. ही सीरिज भारतीय बाजारात नॉर्ड म्हणून लाँच केली जाते आणि भारतीयांनी देखील ह्या सीरिजला चांगला प्रतिसाद दिला आहे. आता आगामी OnePlus Ace सीरीज स्मार्टफोनची माहिती लीक झाली आहे, चला ती पाहूया.

वीबोवर टिपस्टर डीसीएसनुसार, एक नवीन स्मार्टफोन चीनी बाजारात येत आहे. परंतु टिपस्टरनं ह्या फोनच्या नावाचा खुलासा केला नाही, परंतु हा OnePlus Ace 3V असण्याची शक्यता जास्त आहे. Ace 3V चीनी बाजारात येईल तर जागतिक बाजारात ह्या सीरिजचे नाव OnePlus Nord 4 किंवा Nord 5 होऊ शकते. टिपस्टरनुसार आगामी OnePlus Ace 3V मध्ये १.५के रेजॉल्यूशन असलेला डिस्प्ले असेल. हा फोन इंटीग्रेटेड फिंगरप्रिंट स्कॅनर असलेल्या AMOLED स्क्रीनसह बाजारात येईल.

जुन्या एस२व्ही मध्ये MediaTek Dimensity प्रोसेसर होता परंतु OnePlus नं एस ३व्ही साठी क्वॉलकॉमची निवड केली आहे. लिक्सनुसार फोन एसएम७५५० चिपसह येईल जी TSMC च्या ४नॅनोमीटर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसचा वापर करून बनवली जाईल. ही चिप आतापर्यंत रिलीज झाली नाही जी स्नॅपड्रॅगन ७ जेन ३ असण्याची शक्यता आहे.

टिपस्टरने कोणतीही क्लियर लाँच टाइमलाइन सांगितली नाही. त्यामुळे जुन्या जेनरेशन प्रमाणे हा फोन मार्चच्या आसपास लाँच होईल. किंवा OnePlus त्याआधीच हा स्मार्टफोन लाँच करण्याचा निर्णय देखील घेऊ शकते. विशेष म्हणजे क्वॉलकॉमनं अलीकडेच स्नॅपड्रॅगन ७एस जेन २ मिड-रेंज चिपसेट लाँच केला आहे, जो Redmi Note 13 Pro मध्ये आला आहे. चिप गेल्यावर्षीच्या Snapdragon 6 Gen 1 SoC चा रीब्रँड व्हर्जन आहे.

Source link

nord 4 specifications leakOnePlusoneplus ace 3voneplus ace 3v specifications leakoneplus nord 4oneplus nord 4 specifications leak
Comments (0)
Add Comment