नुकतीच याबाबत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून २३ ऑक्टोबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची आहे. तेव्हा या भरती संदर्भात पदे, पात्रता, अर्जप्रक्रिया याची सविस्तर माहिती पाहूया.
‘भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल भरती २०२३’ पदे आणि पदसंख्या:
प्राध्यापक – १० जागा
सहयोगी प्राध्यापक – १३ जागा
सहायक प्राध्यापक – २३ जागा
वरिष्ठ रहिवासी – २२ जागा
कनिष्ठ निवासी – २४ जागा
एकूण पदसंख्या – ९२
शैक्षणिक पात्रता:
प्राध्यापक – संबधित विषयात एमडी/एमडी/डीएनबी आणि कामाचा ८ वर्षांचा अनुभव
सहयोगी प्राध्यापक – संबधित विषयात एमडी/एमडी/डीएनबी आणि कामाचा ५ वर्षांचा अनुभव
सहायक प्राध्यापक – संबधित विषयात एमडी/एमडी/डीएनबी
वरिष्ठ रहिवासी – एमडी/एमडी/डीएनबी
कनिष्ठ निवासी – एमबीबीएस पदवी परीक्षा उत्तीर्ण
(या व्यतिरिक्त सविस्तर पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी खाली लिंक जोडली आहे.)
(वाचा: MRVC Bharti 2023: मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन मध्ये सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी भरती; जाणून घ्या सर्व तपशील)
नोकरी ठिकाण: पुणे
अर्ज पद्धती: ऑफलाईन/ऑनलाईन
निवड प्रक्रिया: मुलाखतीद्वारे
अर्ज ऑफलाइन पाठविण्याचा पत्ता: भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, मंगळवार पेठ, पुणे.
अर्ज ऑनलाइन पाठवण्यासाठी ई-मेल पत्ता: bavmc.pmcrecruitment@gmail.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख: २३ ऑक्टोबर २०२३
या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल’ च्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भात सविस्तर अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन इ-मेल द्वारे किंवा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे. अर्ज भरण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. अपूर्ण राहिलेले किंवा देय तारखेनंतर म्हणजे २३ ऑक्टोबर २०२३ नंतर प्राप्त झालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत..
(वाचा: AIATSL Recruitment 2023: एअर इंडिया मध्ये सुवर्णसंधी! विविध ६१ पदांसाठी थेट मुलाखत घेऊन करणार भरती)