तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख (पुणे)
पोलीस हवालदार इकबाल शेख यांनी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, नाशिक येथे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना केले मोलाचे मार्गदर्शन….
सोलापूर ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेले श्री. इकबाल शेख पोलीस हवालदार सीसीटीएनएस विभाग यांनी सीसीटीएनएस प्रणाली मध्ये आजतागायत उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्र पोलीस दलातील अनेक पोलीस अंमलदार व पोलीस अधिकारी यांना मोलाचे मार्गदर्शन केलेले आहे केलेले.
दिनांक 09/10/2023 ते 11/10/2023 या कालावधीत महाराष्ट्र पोलीस दलातील विविध जिल्ह्यांतील पोलीस उप-निरीक्षक ते पोलीस उप-आयुक्त/ पोलीस उप-अधीक्षक दर्जाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना “Police Station Management” या विषयावर महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, नाशिक येथे तीन दिवसीय सेवा अंतर्गत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
“पोलीस स्टेशन मॅनेजमेंट” या विषयावरील सेवांतर्गत प्रशिक्षणा दरम्यान पोलीस उप-निरीक्षक ते पोलीस उप-आयुक्त/ पोलीस उप-अधीक्षक दर्जाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना सीसीटीएनएस या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करणे करीता तज्ञ व्याख्याते म्हणून श्री. इकबाल शेख यांना महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, नाशिक येथे आमंत्रित करण्यात आले होते. सदर व्याख्याना दरम्यान श्री. इकबाल शेख यांनी प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी यांना “गुन्हे प्रकटीकरणासाठी सीसीटीएनएस प्रणालीचा उपयोग व इतर सरकारी विभागांशी सीसीटीएनएस प्रणालीचे समन्वय” या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले आहे.
श्रीमती अनिता पाटील, पोलीस अधीक्षक तथा उपसंचालक (सेवाअंतर्गत प्रशिक्षण) श्री. तेजस नलावडे, पोलीस निरीक्षक तथा सहाय्यक संचालक व श्री. स्वप्निल उनवणे, पोलीस निरीक्षक तथा सहाय्यक संचालक, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, नाशिक यांचेकडून पुष्परोप देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. तसेच प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी यांनी श्री इक्बाल शेख यांच्या व्याख्यानाचे कौतुक केले आहे.