खबरदार…विद्यार्थ्यांना शुल्कासाठी छळाल तर! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून महाविद्यालयांना इशारा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांकडून महाविद्यालये शुल्कासाठी तकादा लावत असल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महाविद्यालयांना सूचना करीत कारवाईचा इशारा दिला आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शुल्कासाठी छळले किंवा कागदपत्रांची अडवणूक न करण्याबाबत बजावले आहे.

नुकतेच पुणे विद्यापीठाने परिपत्रक प्रसिद्ध करताना महाविद्यालयांना बजावले आहे. केंद्र सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत संलग्नित महाविद्यालये व मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग, आर्थिक दुर्बल घटकातील पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. या लाभार्थी विद्यार्थ्यांना ‘महाडीबीटी’ पोर्टलच्या माध्यमातून शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्कासह इतर शुल्काची प्रतिपूर्ती केली जाते. काही वेळा शासनाकडून प्रतिपूर्ती करताना विलंब होतो. अशा परीस्थितीत काही शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्कासाठी तगादा लावत असल्याचे निदर्शनात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांची अडवणूक केली जात असल्याच्या तक्रारीदेखील प्राप्त झाल्या आहेत. याची दखल घेताना विद्यापीठाने महाविद्यालयांना बजावले आहे. अशाप्रकारे शुल्क वसूल करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई केली जाणार असल्याचे यापूर्वी प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पुणे विद्यापीठाची मोठी कारवाई; तीन जिल्ह्यांतील १३७ प्राध्यापक, ८० कॉलेजांना दंड, कारण…
कारवाईचा इशारा

सूचना देऊनही महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची अडवणूक थांबविली नाही व यासंदर्भात विद्यापीठास तक्रार प्राप्त झाली तर संबंधित महाविद्यालयांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिलेला आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पात्रतेनुसार शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्कासह इतर शुल्काची प्रतिपुर्ती होते, अशा विद्यार्थ्यांकडून कुठल्याही परिस्थितीत शुल्क वसूली करु नये, तसेच कागदपत्रांची अडवणूकदेखील न करण्यास बजावले आहे.

Source link

Maha DBTmahadbt scholarshipNashik newspost matric scholarship schemePune UniversitySavitribai Phule Pune UniversitySavitribai Phule Pune University student
Comments (0)
Add Comment