या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून २३ ऑक्टोबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या पदासाठीची पात्रता, वेतन, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती पाहूया.
‘महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी भरती २०२३’ मधील पद आणि पदसंख्या:
प्रयोगशाळा परिचर – ०२ जागा
एकूण पदसंख्या – ०२ जागा
(वाचा: MRVC Bharti 2023: मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन मध्ये सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी भरती; जाणून घ्या सर्व तपशील)
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून/ महाविद्यालयातून बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच केमिकल लॅबोरेटरी वर्क मध्ये १ वर्ष कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण: राहुरी, अहमदनगर (जिल्हा)
वयोमर्यादा: किमान वयोमर्यादा २१ वर्षे ते कमाल वयोमर्यादा ४० वर्षे.
वेतन: १४ हजार हजार रुपये (मासिक)
अर्ज पद्धती: ऑफलाईन
निवड प्रक्रिया: थेट मुलाखतीद्वारे
अर्ज पाठविण्याचा पत्ता: प्रमुख, कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी ४१३७२२, अहमदनगर, महाराष्ट्र .
अर्ज करण्याची शेवटची तारीख: २३ ऑक्टोबर २०२३
या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी’ यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भात सविस्तर अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. आपले सविस्तर तपशील लिहून अर्ज वरील पत्त्यावर पाठवायचा आहे. तसेच अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे. अर्ज भरण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. अपूर्ण राहिलेले किंवा देय तारखेनंतर म्हणजे २३ ऑक्टोबर २०२३ नंतर प्राप्त झालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
(वाचा: BAVMC Pune Bharti 2023: पुणे महापालिकेच्या अटल बिहारी वाजपेयी रुग्णालयात विविध पदांची भरती; आजच करा अर्ज)