एकच नंबर! कंपनीनं कमी केली Oppo A78 ची किंमत, आता स्वस्तात मिळणार १६ जीबी रॅम असलेला फोन

ओप्पोने काही महिन्यांपूर्वीच आपला A-सीरीज स्मार्टफोन OPPO A78 लाँच केला आहे. हा फोन बाजारात आतापर्यंत १७,४९९ रुपयांमध्ये उपलब्ध होता. तसेच, आता ब्रँडनं ह्याच्या किंमतीत कपात करत युजर्सना मोठी भेट दिली आहे. जर तुम्ही देखील एक स्वस्त मोबाइल विकत घेण्याचा विचार करत असला तर हा फोन तुमच्यासाठी योग्य ठरू शकतो. ह्यात तुम्हाला जीबी पर्यंत रॅम, ५० मेगापिक्सलचा कॅमेरा, ५००० एमएएचची बॅटरी असे अनेक फीचर्स मिळतात.

Oppo A78 ची नवीन किंमत

कंपनीनं Oppo A78 चा ८ जीबी रॅम +१२८ जीबी स्टोरेज मॉडेल १७,४९९ रुपयांमध्ये बाजारात आणला होता. ज्यात ब्रँडनं १००० रूपयांची कपात केली आहे. त्यामुळे आता तुम्ही हा स्मार्टफोन फक्त १६,४९९ रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. तसेच बँक ऑफरमुळे स्मार्टफोन आणखी स्वस्त होईल. हा मोबाइल मिस्टीक ब्लॅक आणि अ‍ॅक्वा ग्रीन अशा दोन कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल.

हे देखील वाचा: नॉर्ड ३ आवडला? मग आता येतोय OnePlus Nord 4; लाँचपूर्वीच लीक झाले स्पेसिफिकेशन्स

Oppo A78 चे स्पेसिफिकेशन्स

ओप्पो ए७८ ४जी फोनमध्ये ६.४३ इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे. ज्यात २४०० x १०८० पिक्सल रिजॉल्यूशन आणि ९०हर्ट्झ रिफ्रेश रेट मिळतो. त्याचबरोबर हा पंच-होल स्क्रीन डिजाइनसह आहे. हा मोबाइल अँड्रॉइड १३ आधारित कलरओएस १३ वर चालतो.

हा क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६८० ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी फोनमध्ये एड्रेनो ६१० जीपीयू देण्यात आला आहे.
मोबाइलमध्ये ८जीबी रॅम एक्सपांशन टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. जिच्या मदतीनं तुम्ही १६जीबी पर्यंत रॅम पावर वापरू शकता.

हे देखील वाचा: स्वदेशी Lava Agni 2 5G वर ६ हजारांची सूट; आधीच स्वस्त असलेल्या फोनवर अ‍ॅमेझॉनकडून जबरदस्त ऑफर्स

फोटोग्राफीसाठी डिवाइसमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात ५० मेगापिक्सलची प्रायमरी लेन्स आणि २ मेगापिक्सल डेप्थ सेन्सर आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ८ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये ५,०००एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. जी ६७ वॉट सुपरवूकला सपोर्ट करते.

Source link

oppooppo a78oppo a78 priceoppo a78 price in indiaओप्पोओप्पो ए७८​oppo a78 price cut
Comments (0)
Add Comment