गंभीर फसवणूक तपास कार्यालयात महाभरती, जाणून घ्या नोकरीचे सर्व तपशील

Serious Fraud Investigation Office Recruitment 2023: देशातील महत्वाच्या तापस यंत्रणापैकी एक असलेल्या ‘एसएफआयओ’ म्हणजेच गंभीर फसवणूक तपास कार्यालय येथे भरती सुरू आहे. या भरती प्रक्रिये अंतर्गत वरिष्ठ सल्लागार, जूनियर सल्लागार आणि यंग प्रोफेशनल या महत्वाच्या पदांच्या एकूण ९१ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

नुकतीच याबाबत (Serious Fraud Investigation Office) अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून या पदांनुसार इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून ९ नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरती प्रक्रियेतील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन आणि सविस्तर माहिती पाहूया.

‘सीरियस फ्रॉड इन्वेस्टिगेशन ऑफिस भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
वरिष्ठ सल्लागार – ०३ जागा
जूनियर सल्लागार – ६२ जागा
यंग प्रोफेशनल – २६ जागा
एकूण पद संख्या – ९१ जागा

(वाचा: Indian Army TGC Recruitment 2023: इंडियन आर्मीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी; ‘१३९ व्या टीजीसी’ साठी आजच करा अर्ज)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता प्रत्येक पदाच्या आवश्यकतेनुसार भिन्न असून त्याचे सविस्तर तपशील अधिसूचनेत नमूद केले आहेत. अधिसूचनेची लिंक खाली जोडलेली आहे.

नोकरी ठिकाण: मुंबई, दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता.

अर्ज पद्धती: ऑनलाईन

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: १८ ऑक्टोबर २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख: अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यापासून २१ दिवसांच्या आत म्हणजे ९ नोव्हेंबर २०२३.

वेतनश्रेणी:
वरिष्ठ सल्लागार – १ लाख ४५ हजार ते २ लाख ६५ हजार
जूनियर सल्लागार – ८० हजार ते १ लाख ४५ हजार
यंद प्रोफेशनल – ६० हजार

या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘गंभीर फसवणूक तपास कार्यालय’ यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भात सविस्तर अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती करिता थेट अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया: याक भरतीकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे. अर्ज भरताना सर्व आवश्यक पर्यायांची आणि कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे. अपूर्ण अर्ज तसेच अंतिम मुदती नंतर म्हणजे ९ नोव्हेंबर नंतर प्राप्त झालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

(वाचा: MPKV Rahuri Recruitment 2023: महात्मा फुले कृषी विद्यापीठात प्रयोगशाळा परिचर पदासाठी भरती; जाणून घ्या सर्व तपशील)

Source link

central government jobsgovernment jobsJob Newsserious fraud investigation officeserious fraud investigation office jobsSFIO Bharti 2023SFIO consultant recruitment 2023SFIO job vacancy 2023SFIO jobs 2023SFIO Recruitment 2023
Comments (0)
Add Comment