इलॉन मस्कनं एक्सवर नवीन अकाऊंट बनवण्यासाठी शुल्क आकारण्यामागे जे कारण सांगितलं आहे तेही विचित्र आहे. त्यांनी सांगतील की अकाऊंट बनवण्यासाठी पैसे घेतल्यामुळे एक्सवर बनावट अकाऊंट बनवणाऱ्यांना आळा घालता येईल. युजर्सनी पैसे आकारण्याऐवजी एक्स प्लॅटफॉर्मवर अकाऊंट बनवण्याचे नियम कडक करण्याचा सल्ला दिला आहे.
हे देखील वाचा: उद्या भारतात येतोय OnePlus Open; लाँच पूर्वीच जाणून घ्या काय वेगळं असेल ह्या फोल्डेबल फोनमध्ये
एक्सवर अकाऊंट बनवण्यासाठी किती पैसे मोजावे लागणार?
नवीन नियमांनुसार तुम्ही पैसे न देता देखली एक्सवर अकाऊंट बनवू शकता परंतु तुम्ही कोणतीही पोस्ट करू शकणार नाही. असे युजर्स फक्त एक्सवरील पोस्ट वाचू शकतील. विशेष म्हणजे फ्री अकाऊंट बनवणाऱ्या युजर्सना एक्सवरील पोस्ट सोबत इंटरॅक्ट करता येणार नाही. म्हणजेच फ्री युजर्स पोस्ट लाइक, रिपोस्ट करू शकणार नाहीत.
मस्कनं लिहलं आहे की मोफत पोस्ट वाचता येतील परंतु पोस्ट लिहण्यासाठी १ यूएस डॉलर म्हणजे सुमारे ८० रुपये दरवर्षी द्यावे लागतील. त्यानं म्हटलं आहे की असं फक्त बॉट विरोधात लढण्यासाठी करण्यात आलं आहे. सध्या हा नियम फक्त दोन देशांमध्ये लागू झाला आहे. तिथे हा प्रयोग यशस्वी झाला तर येत्या काळात बाकी देशांमध्ये देखील हा नियम लागू केला जाईल.
हे देखील वाचा: Apple नेच कमी केली किंमत; डिस्काउंट आणि कॅशबॅकसह iPad ची विक्री सुरु
दोन देशांमध्ये लागू असेल नियम
कोणीही एक्स प्लॅटफॉर्मवर अकाऊंट बनवू शकतात. यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. तसेच सब्सक्रिप्शनविना एक्स प्लॅटफॉर्म देखील वापरता येईल. परंतु मोफत एक्सचे सर्व फीचर्स वापरता येणार नाहीत. गेल्या महिनात देखील इलॉन मस्कनं अकाऊंट बनवण्यासाठी शुल्क आकारण्याची घोषणा केली होती. इलॉन मस्कनं सांगितलं की एक्सवर अकाऊंट बनवण्यासाठी शुल्क आकारण्याचा नियम दोन देशांमध्ये न्यूजीलँड आणि फिलिपिन्स मध्ये लागू होईल. ह्या सब्सक्रिप्शन मॉडेलला ‘Not A Bot’ असं नाव दिलं जाईल.