सुवर्णसंधी! सार्वजनिक बांधकाम विभागात २ हजारांहून अधिक पदांची महाभरती; आजच करा अर्ज

Public Work Department Recruitment 2023: महाराष्ट्र राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागा ( Public Work Department) अंतर्गत मोठी भरती सुरू आहे. या भरतीद्वारे तब्बल २१०९ रिक्त पदांची भरती सरळ सेवेद्वारे केली जाणार आहे. यामध्ये कनिष्ठ अभियंता, लघुलेखक, प्रयोगशाळा सहाय्यक, वाहन चालक, शिपाई, वरिष्ठ लिपिक या आणि अशा एकूण १४ संवर्गाचा समावेश आहे.

याबाबत नुकतीच शासनाची अधिसूचना प्रसिद्ध झाली असून इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती करिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून ०६ नोव्हेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरती प्रक्रियेतील पदे, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याचे तपशील जाणून घेऊया.

‘सार्वजनिक बांधकाम विभाग भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – ५३२ जागा
कनिष्ठ अभियंता (विद्युत) – ५५ जागा
कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ – ०५ जागा
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक – १३७८ जागा
लघुलेखक उच्चश्रेणी – ०८ जागा
लघुलेखक निम्नश्रेणी – ०२ जागा
उद्यान पर्यवेक्षक – १२ जागा
सहाय्यक कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ – ०९ जागा
स्वच्छता निरीक्षक – ०१ जागा
वरिष्ठ लिपिक – २७ जागा
प्रयोगशाळा सहाय्यक – ०५ जागा
वाहनचालक – ०२ जागा
स्वच्छक – ३२ जागा
शिपाई – ४१ जागा
एकूण पदसंख्या – २१०९ जागा

(वाचा: Indian Army TGC Recruitment 2023: इंडियन आर्मीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी; ‘१३९ व्या टीजीसी’ साठी आजच करा अर्ज)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता प्रत्येक पदाच्या आवश्यकतेनुसार भिन्न असून आहे त्याचे तपशील अधिसूचनेत नमूद केले आहेत. अधिसूचनेची लिंक खाली जोडलेली आहे. जिथे क्लिक करून सविस्तर अधिसूचना वाचता येईल.

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

अर्ज पद्धती: ऑनलाइन

निवड प्रक्रिया: संगणकीय माध्यमातून ऑनलाइन परीक्षा.

अर्ज/परीक्षा शुल्क: या भरती करिता खुल्या प्रवर्गास १ हजार रुपये परीक्षा शुल्क आहे तर राखीव प्रवर्गास ९०० रुपये परीक्षा शुल्क आहे.

अर्ज सुरु होण्याची तारीख: १६ ऑक्टोबर २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०६ नोव्हेंबर २०२३

या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘सार्वजनिक बांधकाम विभाग’ यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भात सविस्तर अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती करिता थेट अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया: या महाभरतीकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे. अर्ज भरताना सर्व आवश्यक पर्यायांची आणि कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे. अपूर्ण अर्ज तसेच अंतिम मुदती नंतर म्हणजे ६ नोव्हेंबर २०२३ नंतर प्राप्त झालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

(वाचा: ESIC Maharashtra Recruitment 2023: कर्मचारी राज्य विमा महामंडळ येथे विविध पदांची भरती, आजच करा अर्ज)

Source link

government jobsmaharashtra government jobspublic work department bharti 2023Public Work Department jobsPublic Work Department recruitment 2023PWD bharti 2023pwd department jobsPWD RecruitmentPWD Recruitment 2023
Comments (0)
Add Comment