AICTE ने २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी जाहीर केले सुधारित वेळापत्रक, काय आहेत महत्त्वाचे बदल जाणून घ्या

AICTE 2023-24 Academic Calendar: ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) ने सत्र २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी सुधारित शैक्षणिक कॅलेंडर जारी केले आहे. तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण नियामकाने जाहीर केलेल्या शैक्षणिक कॅलेंडरनुसार, प्रथम वर्षाचे विद्यार्थी तांत्रिक संस्थांमधील रिक्त जागांवर प्रवेश घेऊ शकतात, ज्याची अंतिम तारीख ३० ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.

एआयसीटीईने नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची अंतिम तारीख देखील जाहीर केली आहे. त्यानुसार लॅटरल एंट्री अंतर्गत प्रवेश घेण्याची अंतिम तारीख ३० ऑक्टोबर आहे. त्याचप्रमाणे, संस्थांना AICTE कडून मान्यता मिळण्याची अंतिम मुदत ही ३० ऑक्टोबर ठरवण्यात आली आहे.

(वाचा : National Testing Agency ने जाहीर केले २०२४ मधील परीक्षांचे वेळापत्रक, यादिवशी होणार CUET, NEET, JEE आणि UGC परीक्षा)

तथापि, ऑनलाइन आणि ओडीएल प्रोग्राम असलेल्या संस्थांसाठी प्रथम आणि द्वितीय सत्राच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची अंतिम तारीख यूजीसीनुसार असेल. नुकतीच यूजीसीने यासंदर्भात एक महत्त्वाची नोटीसही जारी केली होती. नोटीसमध्ये शेवटच्या तारखेसह इतर अनेक गोष्टींचा उल्लेख करण्यात आला होता.

याशिवाय, १३ ऑक्टोबर २०२३ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करून AICTE ने पुढील वर्षाचे म्हणजे २०२३-२४ या वर्षासाठी शैक्षणिक कॅलेंडर सुधारित केले आहे. हे कॅलेंडर कौन्सिलच्या वेबसाइट – aicte-india.org वर देखील अपलोड करण्यात आले आहे.

यापूर्वी संस्थांमध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर होती, तर संलग्नता देण्याची अंतिम तारीख ३१ जुलै होती. तथापि, सुधारित शैक्षणिक दिनदर्शिका स्वतंत्र PGDM आणि PGCM संस्थांसाठी लागू होणार नाही.

खरे पाहता, एआयसीटीई, एनसीटीई आणि यूजीसी रद्द करण्याचीही चर्चा आहे. नुकतेच शिक्षणमंत्र्यांनी या सर्वांच्या जागी देशात उच्च शिक्षण आयोग स्थापन करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. लवकरच हे विधेयक संसदेत मांडण्यात येणार आहे. मात्र, वैद्यकीय आणि वकिलीचा अभ्यास यापासून दूर ठेवला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

(वाचा : NEET PG प्रवेशाची बनावट नोटीस व्हायरल; MCC ने दिला इशारा)

Source link

AICTEaicte 2023-24 academic calendaraicte newsAICTE Revised Time Table for Academic Year 2023-24all india council for technical educationdharmendra pradhaneducation newshigher education commissiontechnical educationUGC
Comments (0)
Add Comment