राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानमधील १५ व्या वित्त आयोगांतर्गत ही भरती होणार असून नुकतीच या भरतीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले असून ३१ ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा असून या महाभरतीची सविस्तर माहिती पाहूया
‘पुणे महानगरपालिका आरोग्य विभाग भरती २०२३’ मधील पदे आणि पात्रता:
वैद्यकीय अधिकारी – ९६ जागा
स्टाफ नर्स – ९६ जागा
बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष) – ९६ जागा
एकूण पदसंख्या – २८८ जागा
शैक्षणिक पात्रता:
वैद्यकीय अधिकारी – एमबीबीएस पदवी उत्तीर्ण आणि एमसीआय/एमएमसी नोंदणी आवश्यक
स्टाफ नर्स – जीएनएम किंवा बीएससी नर्सिंग आणि एमएनसी नोंदणी आवश्यक
बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष) – विज्ञान विषयात १२ वी परीक्षा उत्तीर्ण आणि पॅरामेडिकल ट्रैनिंग कोर्स किंवा सॅनेटरी इन्स्पेक्टर कोर्स आवश्यक
(वाचा: ESIC Maharashtra Recruitment 2023: कर्मचारी राज्य विमा महामंडळ येथे विविध पदांची भरती, आजच करा अर्ज)
अर्ज पद्धती: ऑफलाइन
अर्ज शुल्क: या भरतीकरिता कोणतेही अर्ज शुल्क आहे.
नोकरीचे ठिकाण: पुणे.
अर्ज करण्याचा पत्ता: इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, सर्व्हे नं. ७७०/३, बकरे अव्हेन्यू, गल्ली क्र. ७, कॉसमॉस बँकेच्या समोर, भांडारकर रोड, पुणे – ४११००५.
अर्ज करण्याची सुरवात: १८ ऑक्टोबर २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३१ ऑक्टोबर २०२३
या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘पुणे महानगरपालिका’ यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भात सविस्तर अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे. अर्ज करताना आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे. अपूर्ण अर्ज तसेच अंतिम मुदती नंतर म्हणजे ३१ ऑक्टोबर नंतर प्राप्त झालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
(वाचा: Mumbai University News: मुंबई विद्यापीठाचा महत्वपूर्ण सामंजस्य करार; विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे महाद्वार होणार खुले)