‘वन नेशन वन स्टुडन्ट आयडी’च्या निर्णयानंतर, आता एक राज्य एक गणवेश धोरणाची चर्चा

One State One Uniform: केंद्र सरकारच्या समग्र शिक्षा कार्यक्रमाअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून ‘एक राज्य एक गणवेश’ धोरण राबवले जाणार असून, विद्यार्थ्यांना समान रंगाचे दोन गणवेश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत देण्यात येणार आहेत. राज्यातील सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो. त्या अंतर्गत हे गणवेश देण्यात येणार आहे.

चालू शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला ‘एक राज्य एक गणवेश’ धोरण राबवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता. मात्र, शाळा सुरू होण्यास काहीच दिवस बाकी असताना घेतलेल्या निर्णयामुळे शाळा, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

(वाचा : NEET PG प्रवेशाची बनावट नोटीस व्हायरल; MCC ने दिला इशारा)

‘वन नेशन वन स्टुडन्ट आयडी’च्या निर्णयानंतर, आता एक राज्य एक गणवेश धोरणाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील सर्व मुली, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील मुले, दरिद्रयरेषेखालील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात येतो. राज्यातील पात्र असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एका रंग, एक दर्जा असलेला समान गणवेश देण्याच्या दृष्टीने कापड खरेदीसाठी ई-निविदा प्रक्रिया राबवण्यासह तांत्रिक कार्यवाही महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत करण्यात येणार आहे.

स्काऊट-गाईड विषयास अनुरुप गणवेश :

‘एक राज्य एक गणवेश’ अंतर्गत मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची पँट किंवा हाफ पँट, मुलींना आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाचा स्कर्ट किंवा गडद निळ्या रंगाची सलवार, आकाशी रंगाची कमीज असे गणवेशाचे स्वरुप असणार आहे. एका गणवेशाला विद्यार्थ्यांच्या शर्टवरती शोल्डर स्ट्रिप आणि दोन खिसे असणे आवश्‍यक आहे. गणवेश शिलाईचे काम स्थानिक महिला बचत गटामार्फत करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाकडून सहकार्य घेण्याची कार्यवाही महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने करावी, असे नमूद करण्यात आले आहे.

(वाचा : AICTE ने २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी जाहीर केले सुधारित वेळापत्रक, काय आहेत महत्त्वाचे बदल जाणून घ्या)

Source link

champachandrakant patilDeepak Kesarkareducation newseducational year 2024-2025National Education PolicyNEPone state one uniformone state one uniform policyschools students update
Comments (0)
Add Comment