आयफोनला टक्कर देण्यासाठी शाओमी सज्ज; दणकट Xiaomi 14 सीरीजचा लाँच कंपनीनं केला कंफर्म

शाओमीची दणकट Xiaomi 14 सीरीज ह्याच महिन्यात बाजारात येणार आहे. कंपनीनं घोषणा केली आहे की डिवाइस ऑक्टोबरमध्ये सादर होतील. विशेष म्हणजे ह्या सीरीजच्या फोन्समध्ये Leica Summilux लेन्स दिली जाईल हे देखील कंफर्म झालं आहे. म्हणजे ह्यातील कॅमेरा सेटअप जबरदस्त असणार हे स्पष्ट आहे. चला, जाणून घेऊया लाँच टाइमलाइन आणि संभाव्य स्पेसिफिकेशन्स.

Xiaomi 14 सीरीज लाँच कंफर्म

Xiaomi 14 फ्लॅगशिप सीरीज बद्दल ब्रँडनं मायक्रो ब्लॉग्गिंग साइट वीबोवर पोस्टर शेयर करून लाँचची माहिती दिली आहे. कंपनीनं चिनी भाषेतील एक पोस्टर शेयर केला आहे, ज्यात सांगण्यात आलं आहे की हे मोबाइल ह्याच महिन्यात येतील.

हे देखील वाचा: OnePlus चा सर्वात पहिला फोल्डेबल फोन आज येतोय भारतात; अशाप्रकारे बघता येईल लाइव्ह इव्हेंट

या सीरीजमध्ये युजर्सना Xiaomi 14 आणि Xiaomi 14 Pro सारखे डिवाइस मिळू शकतात. त्यानंतर अल्ट्रा मॉडेल पुढील वर्षी २०२४ मध्ये येऊ शकतो. पोस्टर मध्ये फोन्स Leica Summilux लेन्स ब्रँडिंगसह येतील हे सांगण्यात आले आहे. कॅमेऱ्यात नवा इमेज सेन्सर देखील जोडला जाऊ शकतो.

Xiaomi 14 चे लीक स्पेसिफिकेशन्स

Xiaomi 14 मध्ये ६.४४ इंचाचा Huaxing C8 OLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. ज्यात १.५के रिजॉल्यूशन, १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट, २८० निट्स ब्राइटनेस, १२-बिट कलर, एचडीआर१०+ सपोर्ट, डीसीआय-पी३ कलर गमुट आणि डॉल्बी व्हिजनचा सपोर्ट मिळू शकतो.

मोबाइलमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ प्रोसेसर मिळण्याची शक्यता आहे. सोबत एलपीडीडीआर५एक्स रॅम आणि यूएफएस ४.० इंटरनल स्टोरेज मिळू शकते. स्मार्टफोनमध्ये व्हीसी कूलिंग सिस्टम, २-इन-१ मोटर, ड्युअल स्टीरियो स्पिकर, ड्युअल-फ्रिक्वेन्सी जीपीएस, आयआर ब्लास्टर आणि आयपी६८ रेटिंग सारखे अनेक फीचर्स मिळू शकतात.

हे देखील वाचा: Nokia च्या सर्वात स्वस्त 5G Phone वर जबरदस्त सूट; मर्यादित कालावधीसाठी अ‍ॅमेझॉनवर ऑफर

Xiaomi 14 डिवाइस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येऊ शकतो. ह्यात ओआयएस आणि Leica Summilux लेन्ससह ५० मेगापिक्सलचा ओव्ही५०एच प्रायमरी कॅमेरा, ५० मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि ५० मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाऊ शकतो. Xiaomi 14 मध्ये ४६००एमएएचची बॅटरी ९० वॉट वायर्ड चार्जिंग, ५० वॉट वायरलेस चार्जिंग आणि १० वॉट रिवर्स वायरलेस चार्जिंग दिली जाऊ शकते.

Source link

Xiaomixiaomi 14 launch datexiaomi 14 pro launch datexiaomi 14 seriesxiaomi 14 series launch date
Comments (0)
Add Comment