२०२४ च्या दहावी परीक्षेसाठी अर्ज भरण्याला आजपासून सुरुवात; ‘या’ तारखेपर्यंत सुरू राहणार अर्ज प्रक्रिया

SSC 2024 Exam Forms: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) मार्च-२०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी शालान्त परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आज, शुक्रवार २० ऑक्टोबर २०२३ पासून सुरुवात होणार असून, सरल डाटाबेसवरून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया शाळांना २० नोव्हेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करावी लागणार आहे.

MSBSHSE बोर्डाने जाहीर केल्याप्रमाणे, बारावी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया या आधीच सुरू झाली आहे. आता शिक्षण मंडळाने दहावी परीक्षेसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. शिक्षण मंडळाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, माध्यमिक शाळांनी नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे सरल डाटाबेसवरुन २० ऑक्टोबरपासून भरायला सुरुवात करावी. ही आवेदनपत्रे नियमित शुल्कासह पुढील महिनाभर भरता येणार असल्याचेही त्यांनी या पत्रकात नमूद केले आहे.

(वाचा : Board Exams 2024: दहावी आणि बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर; २०२४ मध्ये या दिवसांमध्ये पार पडणार बोर्डाच्या परीक्षा)

सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे अचूक भरुन सबमिट केल्यानंतर आवेदनत्रे भरावयाच्या भरण्याच्या कालावधीमध्ये माध्यमिक शाळांना त्यांच्या लॉगीनमधून प्रीलिस्ट उपलब्ध करुन दिलेली असेल. माध्यमिक शाळांनी त्याची प्रिंट काढून विद्यार्थ्यांमार्फत आवेदनत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळून अचूक असल्याची खात्री करून घेणे गरजेचे आहे.

मार्च २०२४ मधील परीक्षेसाठी मार्च २०२३ अथवा जुलै-ऑगस्ट २०२३ मधील परीक्षेमध्ये एकाचवेळी सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत आवेदनपत्र भरून परीक्षेस प्रविष्ठ होता येणार आहे, असेही म्हटले आहे.

मार्च-२०२४ शालान्त परीक्षेचे अर्ज आणि या प्रक्रिये संदर्भातील महत्त्वाची माहिती Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education च्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

(वाचा : JEE Main 2024: जेईई मेन २०२४ची अर्ज नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू होणार, वयोमर्यादा आणि इतर पात्रता तपशील जाणून घ्या)

Source link

msbshsesscssc 2024ssc 2024 registrationssc 2024 time tablessc board exam 2024SSC Board Exams 24ssc exam formssc examinationwww.mahahsscboard.in
Comments (0)
Add Comment