आयआयटी खरगपूर मध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या १८२ जागांवर पद भरती; असा करा अर्ज

IIT Kharagpur Recruitment 2023: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खरगपूर (IIT Kharagpur) मध्ये १८२ रिक्त जाग भरण्यासाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आयआयटीमधील शिकेतर कर्मचारी पदासाठी ही भरती असून, ३० ऑक्टोबर ही अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे, सदर भरती अंतर्गत अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट iitkgp.ac.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

Indian Institute of Technology Kharagpur मधील ही भरतीसाठी आवश्यक सर्व पात्रता आणि निकषांच्या चौकटीत बसणारे उमेदवार ३० ऑक्टोबरपर्यंत त्यांचे अर्ज सादर करू शकणार आहेत.

आयआयटीमधील या भरतीमध्ये रजिस्ट्रार, स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, उप ग्रंथपाल, समुपदेशक, कार्यकारी अधिकारी, तांत्रिक अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, कनिष्ठ लेखाधिकारी, शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक आणि इतर अनेक पदांचा समावेश आहे. संस्थेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन उमेदवार अधिक माहिती तपासू शकतात.

(वाचा : BMC Recruitment 2023: दहावी आणि बारावी पाससाठी उमेदवारांसाठी मुंबई महापालिकेत परिचारीका पदावर नोकरी)

अर्ज शुल्काविषयी :

अनारक्षित, OBC आणि EWS श्रेणीतील अर्जदारांना १००० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल, तर SC/ST/PWD उमेदवारांना फक्त ५०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.

आयआयटी खरगपूर भरतीसाठी अर्ज करण्यासाठी :

पायरी 1: IIT खरगपूरच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
पायरी 2: मुख्यपृष्ठावर दिलेल्या द्रुत लिंकवर जा.
पायरी 3: ऑनलाइन अर्ज लिंकवर क्लिक करा.
पायरी 4: स्वतःची नोंदणी करा आणि अर्ज प्रक्रियेसह पुढे जा
पायरी 5: स्कॅन केलेली कागदपत्रे अपलोड करा, फी भरा आणि अर्ज सबमिट करा.
पायरी 6: IIT खरगपूर अर्ज फॉर्म 2023 डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.

उमेदवारांनी विहित तारखेपर्यंत आणि मार्गदर्शक तत्त्वांनुसार अर्ज करणे अनिवार्य असेल. कारण कोणत्याही उमेदवाराचा चुकीचा फॉर्म आयआयटी खरगपूर स्वीकारणार नाही. याशिवाय विहित तारखेनंतरही कोणत्याही उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.

(वाचा : MH CET 2024 Updates: महाराष्ट्र सीईटी २०२४ चे वेळापत्रक जाहीर, कोणती CET परीक्षा कधी होणार? या आहेत तारखा)

Source link

apply at iit kharagpuriit jobsiit kharagpuriit kharagpur recruitment 2023iit non-teaching staff jobsjobs at iitआयआयटी
Comments (0)
Add Comment