केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत विविध पदांची भरती; आजच करा अर्ज

‘सीपीसीबी’ म्हणजेच (Central Pollution Control Board) केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ येथे भरती सुरू आहे. नियंत्रण मंडळाच्या प्रशासकीय विभागातील ही भरती असून यामध्ये वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, लेखाधिकारी, सहाय्यक लेखाधिकारी, वरिष्ठ तांत्रिक पर्यवेक्षक, खाजगी सचिव, तांत्रिक पर्यवेक्षक अशा पदांचा समावेश आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने नुकतीच याबाबत अधिसूचना जाहीर केली असून एकूण ११ रिक्त पदे भरली जाणार आहेत. या पदांकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून १३ नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरती प्रक्रियेचे सर्व तपशील पाहूया.

‘केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी – ०१ जागा
लेखाधिकारी – ०१ जागा
सहाय्यक लेखाधिकारी – ०१ जागा
वरिष्ठ तांत्रिक पर्यवेक्षक – ०२ जागा
खाजगी सचिव – ०३ जागा
तांत्रिक पर्यवेक्षक – ०३ जागा
एकूण पदसंख्या – ११ जागा

(वाचा: MPSC Recruitment 2023: ‘एमपीएससी’ अंतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभागात ३७८ पदांची महाभरती! आजच करा अर्ज)

शैक्षणिक पात्रता: पदाच्या संबधित विषयातील पदवी, पदव्युत्तर पदवी किंवा अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय इतर शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून त्याचे तपशील अधिसूचनेत दिलेले आहेत. अधिसूचनेची लिंक खाली नमूद केली आहे.

वेतनश्रेणी:
वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी – ७८ हजार ८०० ते २ लाख ९ हजार २००
लेखाधिकारी – ४४ हजार ९०० ते १ लाख ४२ हजार ४००
सहाय्यक लेखाधिकारी – ४४ हजार ९०० ते १ लाख ४२ हजार ४००
वरिष्ठ तांत्रिक पर्यवेक्षक – ४४ हजार ९०० ते १ लाख ४२ हजार ४००
खाजगी सचिव – ४४ हजार ९०० ते १ लाख ४२ हजार ४००
तांत्रिक पर्यवेक्षक – ३५ हजार ४०० ते १ लाख १२ हजार ४००

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: प्रशासकीय अधिकारी (भरती), केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, परिवेश भवन, पूर्व अर्जुन नगर, शाहदरा, दिल्ली ११००३२.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: १३ नोव्हेंबर २०२३

या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ’ यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भात सविस्तर अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे. अर्ज करताना अर्जासह आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे. अपूर्ण अर्ज तसेच अंतिम मुदती नंतर म्हणजे १३ नोव्हेंबर नंतर प्राप्त झालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

(वाचा: CPCB Recruitment 2023: केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात विविध पदांची भरती! जाणून घ्या अर्ज करण्याची अंतिम तारीख..)

Source link

central government jobs 2023Central Pollution Control Board recruitment 2023CPCB Bharti 2023CPCB Recruitment 2023jobs for graduatesकेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती
Comments (0)
Add Comment