भारतीय सशस्त्र सेनेत महिला आणि पुरुष उमेदवारांसाठी ‘वैद्यकीय अधिकारी’ पदाच्या ६५० जागा रिक्त; काम करून देशसेवेची संधी

AFMS Recruitment 2023: सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा अंतर्गत विविध पदांच्या तब्बल ६५० जागांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये ५८५ पुरुष तर, ६५ महिला उमेदवारांची निवड केली जाणार आहे. सदर भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ नोव्हेंबर २०२३ असणार आहे.

पदभरतीचा तपशील :

संस्था : सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा (Armed Forces Medical Services)
भरले जाणारे पद : वैद्यकीय अधिकारी
पद संख्या : ६५० जागा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ५ नोव्हेंबर २०२३

मुलाखतीचे ठिकाण : दिल्ली
मुलाखतीचा पत्ता आणि वेळ : २१ नोव्हेंबर २०२३ पासून आर्मी हॉस्पिटल (आर अँड आर) येथे

(वाचा : IIT Kharagpur Recruitment 2023: आयआयटी खरगपूर मध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या १८२ जागांवर पद भरती; असा करा अर्ज)

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  • सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा अंतर्गत जागांसाठी अर्ज करणार्‍या उमेदवारकडे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या (National Medical Council) मेडिकल कौन्सिल कायदा, २०१९ मध्ये समाविष्ट असलेली वैद्यकीय पात्रता असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराची कोणत्याही राज्य मेडिकलमधून कायमस्वरूपी नोंदणी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराकडे State Medical Council / NMC / MCI यांच्याकडून प्राप्त झालेले कायमस्वरूपी रजिस्ट्रेशन असणे गरजेचे आहे.
  • State Medical Council / NBE / NMC द्वारे मान्यताप्राप्त पदव्युत्तर पदवीधारक देखील या जागांसाठी अर्ज करू शकतात.
  • ज्या पुरुष आणि महिला उमेदवारांनी ३१ ऑगस्ट २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी त्यांची इंटर्नशिप पूर्ण केली आहे आणि NEET PG साठी पात्र ठरणार आहेत.

(शैक्षणिक पात्रतेच्या अधिक महितीसाठी मूळ जाहिरात पहा)

वयोमर्यादा :

MBBS असल्यास उमेदवाराचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. (फक्त २ जानेवारी १९९४ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेले पात्र आहेत)
पीजी पदवी धारण केल्यास ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. (फक्त २ जानेवारी १९८९ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेले ते पात्र आहेत)

अर्ज शुल्क :

सशस्त्र सेना चिकिस्ता सेवेमध्ये अर्ज करणार्‍या उमेदवारला ऑनलाइन अर्ज भरताना २०० रुपये अर्ज शुल्क भरणे अनिवार्य असणार आहे.

AFMS Recruitment 2023 असा करा अर्ज :

1. या पदासाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अन्य कोणत्याही माध्यमातून आलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. उमेदवारांनी या लिंक वरून अर्ज करावे. (अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा)
5. नोंदणीसाठीच्या सूचना मंडळाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.

(वाचा : BMC Recruitment 2023: दहावी आणि बारावी पाससाठी उमेदवारांसाठी मुंबई महापालिकेत परिचारीका पदावर नोकरी)

Source link

afms recruitment 2023armed force medical servicesdelhiindiaindian armed forcesjobs for medical candidatesnational medical councilnmc
Comments (0)
Add Comment