शिक्षण क्षेत्रातील अनेक अनुभवी उमेदवार या पदासाठी अर्ज करत असतात. अध्यापन, संशोधन आणि दमदार अनुभव असलेले राज्यभरातील प्राध्यापक या शर्यतीत असतात. नुकतीच या पदासाठीची अधिसूचना प्रसिद्ध झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून १७ नोव्हेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या पदासाठीची पात्रता, अर्ज करण्याची पद्धती, शेवटची तारीख याची सविस्तर माहिती पाहूया.
‘संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती २०२३’ मधील पदे आणि पात्रता:
कुलगुरू – ०१ जागा
एकूण पदसंख्या – ०१ जागा
शैक्षणिक पात्रता: विद्यापीठ अनुदान आयोगाने आखून दिलेल्या विद्यापीठ अधिनियमानुसार कुलगुरू पदासाठीआवश्यक ती शैक्षणिक पात्रता आणि अध्यापनासह संशोधन विषयातील अनुभव ग्राह्य धरला जाईल.
(वाचा: Nashik Mahanagarpalika Bharti 2023: नाशिक महानगरपालिकेत विविध पदांची भरती, ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख)
नोकरी ठिकाण: अमरावती
अर्ज पद्धती: ऑफलाईन आणि ऑनलाइन
ऑफलाइन अर्ज पाठविण्याचा पत्ता: सहयोगी प्राध्यापक, यांत्रिक अभियांत्रिकी विभाग, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ, शिवाजीनगर, पुणे ४११००५.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ई-मेल पत्ता: nodalofficer.sgbau@gmail.com
अर्ज करण्याची/ पोहोचवण्याची शेवटची तारीख : १७ नोव्हेंबर २०२३
या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती’ यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भात सविस्तर अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
निवड प्रक्रिया: आलेल्या अर्जातून यूजीसीच्या निकषानुसार कुलगुरू पदासाठी पात्र असणार्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलावले जाईल. पात्र उमेदवाराशी निवड समिती संवाद साधेल. उमेदवाराने समिती समोर या पदासाठी स्वतःच्या योग्यतेविषयी दोन पाने आणि कुलगुरू झाल्यास विद्यापीठासाठी कोणते व्हीजन असेल याविषयी दोन पाने लेखन करून देणे आवश्यक आहे. अर्ज ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करायचा असून अंतिम तारखे नंतर म्हणजे १७ नोव्हेंबर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
(फोटो सौजन्य – संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ)
(वाचा: Exam Tips: योग्य वेळेत, संपूर्ण पेपर कसा सोडवायचा? वाचा परीक्षेसाठीच्या खास टिप्स)