या भरतीसंदर्भात ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ ने नुकतीच अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. राज्यासह भारतभरातील जागांसाठी ही भरती असणार आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले असून ६ नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तेव्हा या भरती प्रक्रियेतील पदे, पदसंख्या, पात्रता, वयोमार्यादा, वेतन आणि सविस्तर माहिती पाहूया.
‘बँक ऑफ महाराष्ट्र भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
क्रेडिट ऑफिसर स्केल II – ५० जागा
क्रेडिट ऑफिसर स्केल III – ५० जागा
एकूण रिक्त पदसंख्या – १०० जागा
शैक्षणिक पात्रता:
क्रेडिट ऑफिसर स्केल II – कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून/ विद्यापीठातून ६० टक्के गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण (राखीव प्रवर्गाला ५५ टक्के) तसेच बँकिंग क्षेत्रातील पदव्युत्त पदवी/ एमबीए फायनान्स, बँकिंग आणि अन्य काही शाखांमधून उत्तीर्ण अरणे आवश्यक आहे. तसेच संबधित कामाचा तीन वर्षांचा अनुभव असावा.
क्रेडिट ऑफिसर स्केल III – कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून/ विद्यापीठातून ६० टक्के गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण (राखीव प्रवर्गाला ५५ टक्के) तसेच बँकिंग क्षेत्रातील पदव्युत्त पदवी/ एमबीए फायनान्स, बँकिंग आणि अन्य काही शाखांमधून उत्तीर्ण अरणे आवश्यक आहे. तसेच संबधित कामाचा पाच वर्षांचा अनुभव असावा.
(या व्यतिरिक्त सविस्तर पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली नमूद केली आहे.)
(वाचा: SGBAU Amravati Recruitment 2023: अमरावती विद्यापीठात ‘कुलगुरू’ पदाची भरती; जाणून घ्या सर्व तपशील)
वयोमर्यादा:
क्रेडिट ऑफिसर स्केल II – किमान २५ वर्षे कमाल ३२ वर्षे
क्रेडिट ऑफिसर स्केल III – किमान २५ वर्षे ते कमाल ३५ वर्षे
वेतनश्रेणी:
क्रेडिट ऑफिसर स्केल II – ४८ हजार १७० ते ६९ हजार ८१०
क्रेडिट ऑफिसर स्केल III – ६३ हजार ८४० ते ७८ हजार २३०
नोकरीचे ठिकाण: महाराष्ट्र राज्यासह भारतातील काही प्रमुख राज्यात
अर्ज पद्धती: ऑनलाईन
अर्ज शुल्क: ११८० रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी ११८ रुपये.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०६ नोव्हेंबर २०२३
या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भात सविस्तर अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरतीकरिता थेट अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
(वाचा: Exam Tips: योग्य वेळेत, संपूर्ण पेपर कसा सोडवायचा? वाचा परीक्षेसाठीच्या खास टिप्स)