‘रेलटेल कॉर्पोरेशन इंडिया’ मध्ये ‘या’ पदांसाठी भरती; पगारही आहे भरपूर

RailTel Corporation India Limited Recruitment 2023: तुम्ही पदवीधर असाल आणि टेलीकॉम इंडस्ट्रीमध्ये जॉब शोधत असाल तर तुमच्यासाठी एक खास संधी चालून आली आहे. टेलिकॉम जगतातील महत्वाच्या मानल्या जाणार्‍या केंद्र सरकारच्या अंतर्गत येणार्‍या रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथे भरती सुरू आहे. नुकतीच या भरतीबाबत ‘रेलटेल’ने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

या भरती अंतर्गत ‘सहायक व्यवस्थापक’ आणि ‘उपव्यवस्थापक’ या पदांच्या एकूण ८१ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून ११ नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, वेतन आणि अर्ज प्रक्रिया आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख याची सविस्तर माहिती पाहूया.

रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती २०२३ मधील पदे आणि पदसंख्या:
सहाय्यक व्यवस्थापक – ३९ जागा
उपव्यवस्थापक – ४२ जागा
एकूण पदसंख्या – ८१ जागा

शैक्षणिक पात्रता:
सहाय्यक व्यवस्थापक – संबधित विषयातील पदव्युत्तर पदवी
उपव्यवस्थापक – संबधित विषयातील अभियांत्रिकी पदवी आणि पदव्युत्तर पदवी
(या व्यतिरिक्त सविस्तर पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. सविस्तर अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.)

(वाचा: SGBAU Amravati Recruitment 2023: अमरावती विद्यापीठात ‘कुलगुरू’ पदाची भरती; जाणून घ्या सर्व तपशील)

वयोमर्यादा:
सहायक व्यवस्थापक – किमान २१ वर्षे आणि कमाल २८ वर्षे
उपव्यवस्थापक – किमान २१ वर्षे आणि कमाल ३० वर्षे

वेतनश्रेणी:
सहायक व्यवस्थापक – ३० हजार ते १ लाख २० हजार
उपव्यवस्थापक – ४० हजार ते १ लाख ४० हजार

अर्ज पद्धती: ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ११ नोव्हेंबर २०२३

या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भात सविस्तर अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरतीकरिता थेट अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर म्हणजेच ११ नोव्हेंबर आधी सादर करणे गरजेचे आहे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे. अपूर्ण अर्ज आणि अंतिम मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

(फोटो सौजन्य – रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया)

(वाचा: GLC Mumbai Recruitment 2023: मुंबईतील ‘जीएलसी’ लॉ कॉलेज मध्ये लिपिक पदासाठी भरती; थेट मुलाखत पद्धतीने निवड)

Source link

jobs for graduatesRailTel Bharti 2023railtel corporation india limited jobsRailTel Recruitment 2023रेलटेल कॉर्पोरेशनरेलटेल भरती २०२३
Comments (0)
Add Comment