विद्यार्थ्यांनी त्याच्या लॉगिन मध्ये पीएनआर टाकल्यास त्याला त्याची परीक्षा, त्याचा आसन क्रमांक व परीक्षा केंद्र याची त्याला तात्काळ माहिती मिळते. तसेच परीक्षेच्या प्रवेश पत्रात काही दुरूस्ती असल्यास विद्यार्थी महाविद्यालयास संपर्क साधून सुधारित प्रवेशपत्र प्राप्त करून घेऊ शकतो.
(वाचा : Mumbai University: मुंबई विद्यापीठात सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाची सुरुवात; दर तासाला १२०० लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया)
मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या हिवाळी सत्राच्या ४३९ परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. हिवाळी सत्राच्या या परीक्षा ऑक्टोबर पासून सुरुवात होत आहेत. परीक्षेच्या तारखेसोबतच ८४ परीक्षेचे वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहेत.
विद्यापीठाच्या परीक्षा आणि परीक्षांची तारीख :
१. बीकॉम सत्र ५ : २६ ऑक्टोबर २०२३
२. बीए सत्र ५ : ३० ऑक्टोबर २०२३
३. बीएस्सी सत्र ५ : ३० ऑक्टोबर २०२३
४. बीएस्सी आयटी सत्र ५ : २४ नोव्हेंबर २०२३
५. बीए एमएमसी सत्र ५ : २४ नोव्हेंबर २०२३
६. बीकॉम फिनांशियल मार्केटस, बीकॉम बँकिंग अँड इन्शुरन्स, बीकॉम अकाऊंटिंग अँड फायनान्स, बीकॉम इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट, बीकॉम फिनांशियल मॅनेजमेंट आणि बीकॉम ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सत्र ५ : १ डिसेंबर २०२३
विद्यार्थ्यास त्याचे परीक्षा केंद्र व इतर माहिती विद्यापीठाच्या https://mum.digitaluniversity.ac/ या संकेतस्थळावर know your examination venue या लिंकवर मिळेल.
(वाचा : बहुविद्याशाखीय शिक्षणाला चालना देण्यासाठी मुंबई विद्यापीठाचा पुढाकार; उच्च शिक्षणाच्या विविध क्षेत्रातील संधीचे दालन होणार खुले)