गेल्या काही वर्षात तर याचे प्रमाण बरेच वाढले आहे. अर्थात तुमची पात्रता असेल तर तुम्हाला उत्तम नोकरी मिळतेही, पण एकीकडे बेरोजगारीचा प्रश्न गंभीर होत असताना असे नोकरी सोडणे हे आव्हानात्मक आणि तितकेच धोकादायकही ठरू शकते. कारण नोकरीतून मिळणार्या पगारावरच आपल्या घराचा आणि स्वप्नांचा डोलारा उभा असल्याने त्या बाबतीतले निर्णय चुकले तर ते निश्चितच परवडण्यासारखे नाही. म्हणूनच जर आपण नोकरीचा राजीनामा देत असू किंवा तसा आपल्या विचार मनात असेल तर त्याआधी काही गोष्टींचा गांभीर्यपूर्वक विचार होणे गरजेचे आहे. त्याच खास टिप्स कोणत्या हे पाहूया..
नियोजन गरजेचे: अनेकदा काही घटना घडतात आणि आपण तडकाफडकी राजीनामा देण्याच्या निर्णय घेतो. पण मनात आले आणि नोकरीचा राजीनामा दिला असे होत नाही. तास करणे हे अत्यंत चुकीचे ठरू शकते. ज्याप्रमाणे आपण एखाद्या कार्यक्रमाचे, भविष्याचे नियोजन करतो तसेच राजीनामा देतानाही त्याचे नियोजन असला हवे. त्याची पूर्वतयारी आणि नंतरच्या गोष्टी या आपल्यासमोर स्पष्ट असायला हव्यात. राजीनामा हा पूर्व नियोजन आणि भविष्याची तरतूद करून द्यावा.
हे प्रश्न महत्वाचे: राजीनामा हा करिअर मधला मोठा निर्णय असल्याने तो देण्याआधी आपल्या डोक्यात काही गोष्टी स्पष्ट असणे गरजेचे आहे. ते म्हणजे आपण राजीनामा देण्याच्या निर्णयावर ठाम आहोत का?, राजीनामा देण्याची मानसिक तयारी आहे का?, राजीनामा का देत आहोत?, राजीनाम्यानंतर पुढे काय करणार आहोत? हा निर्णय मागे घ्यावासा वाटतोय का? हे प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवेत. त्याची उत्तरे आपल्याला योग्य निर्णयापर्यंत घेऊन जातात.
(वाचा: RailTel Recruitment 2023: ‘रेलटेल कॉर्पोरेशन इंडिया’ मध्ये ‘या’ पदांसाठी भरती; पगारही आहे भरपूर)
आर्थिक तरतूद हवी: जर तुम्ही अचानक राजीनामा देण्याचा निर्णय घेत असाल किंवा तुम्हाला काही कारणाने तातडीने राजीनामा द्यावा लागत असले तर अशावेळी कायम आपल्याकडे आर्थिक तरतूद हवी. त्यासाठी चार पैसे गाठीशी बाळगणे हे कधीही फायदेशीर ठरते. सध्याचा काळ प्रचंड अनिश्चित असल्याने तुमची एक नोकरी जाऊन दुसरी मिळेपर्यंत मधल्या काळात तुम्हाला आर्थिक हातभार व्हावा यासाठी ही तरतूद गरजेची आहे. ती नसेल तर आर्थिक तरतुदीचे किंवा नव्या कमाईचे पर्यायही आपण शोधला हवे.
नवी नोकरी किंवा पर्याय हवा: राजीनामा देताना सर्वात महत्वाची गोष्ट प्रकर्षाने पाळली पाहिजे, ती म्हणजे दुसरी नोकरी हातात आल्यावरच पहिल्या नोकरीला राजीनामा द्यावा. नवी नोकरी नसेल तर राजीनामा देण्याचा फेरविचार करावा. जर नोकरी नसेल तर एखादा व्यवसाय किंवा फ्री लान्सर म्हणून तुम्ही कसे पैसे कमावू शकता याचा विचार करणे गरजेचे आहे. जेणेकरून काम सोडल्याचा मानसिक आणि आर्थिक जाणवणार नाही.
संयम हवा: काहीवेळा एखाद्या कंपनीमध्ये आपल्या सोबत राजकारण होऊ शकते, आपल्याला राजीनामा देण्यासाठी प्रवृत्त केले जाऊ शकते किंवा कामाच्या ताणामुळे किंवा मानसिक ताणामुळे राजीनामा देण्याची वेळ येऊ शकते. अशावेळी परिस्थितीच्या विरोधात जाण्यापेक्षा किंवा कंटाळून राजीनामा देण्यापेक्षा संयमी राहणे अत्यंत गरजेचे आहे. कारण तुमच्या हातात दुसरे अर्थार्जनचे साधन नसल्याने या निर्णयाचा मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे आहे त्या परिस्थितीशी काहीकाळ जुळवून घेणे किंवा संबधित वरिष्ठांच्या, कंपनीच्या कलाने घेणे हे फायद्याचे ठरू शकते.
आव्हान स्वीकारा: बर्याचदा असेही होते की एखादी चांगली नोकरी चालून येते पण आधीचेही काम उत्तम सुरू असते. अशावेळी दोन्ही कामांमधील बर्या वाईट गोष्टी पडताळून शहानिशा करावी. जर आपली आर्थिक उन्नती होत असेल आणि कामाच्या निमित्ताने नव्या गोष्टी शिकायला मिळत असतील तर आव्हान घेऊन जुन्या नोकरीचा राजीनामा देणे योग्य ठरू शकते. अर्थात त्याचा निर्णय सर्वस्वी तुमच्यावर आणि संबधित परिस्थितीवर निर्भर आहे.
(वाचा: BOM Recruitment 2023: बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये पदवीधरांसाठी मोठी भरती; आजच करा अर्ज)