पालिकेने नुकतीच याबाबत अधिसूचना जाहीर केली असून या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून ०६ नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरती प्रक्रियेतील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याची सविस्तर माहिती पाहूया.
‘पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
कला शिक्षक – ३२ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ३२ जागा
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शासन मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून कला शिक्षक डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच फाईन आर्ट विषयात पदवी किंवा पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असावी. संबधित कामाचा अनुभव असेल तर प्राधान्य दिले जाईल.
(वाचा: RailTel Recruitment 2023: ‘रेलटेल कॉर्पोरेशन इंडिया’ मध्ये ‘या’ पदांसाठी भरती; पगारही आहे भरपूर)
वेतन: २८ हजार मासिक
अर्ज पद्धती: (ऑफलाइन) प्रत्यक्ष कार्यालयात येऊन सादर करणे.
अर्ज यांच्या नावे करावा: मा. अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
अर्ज पाठविण्याचा पत्ता: जुना ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा. पाटील मनपा प्राथमिक शाळा, पिंपरीगाव
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०६ नोव्हेंबर २०२३
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘पिंपरी चिंचवड महानगरपालिका’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
‘कला शिक्षक’ पदाच्या या भरतीसंदर्भात अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच समक्ष कार्यालयात जाऊन सादर करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. अर्ज शेवटच्या तारखे नंतर म्हणजे ०६ नोव्हेंबर नंतर आल्यास ग्राह्य धरला जाणार नाही. उमेदवारांची निवड त्यांचे शिक्षण आणि शालेय अध्यापनाचा अनुभव यांच्या आधारावर केली जाईल.
(वाचा: BOM Recruitment 2023: बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये पदवीधरांसाठी मोठी भरती; आजच करा अर्ज)