मुंबई विद्यापीठाच्या बीकॉम सत्र ५ ची परीक्षा आजपासून, अचूकतेसाठी नव्या प्रणालीचा अवलंब

सध्या सर्वत्र हिवाळी सत्र परीक्षांचे वारे वाहू लागले आहेत. शाळा आणि महाविद्यालयासोबतच आता विद्यापीठातही परीक्षेचे बिगुल बाजले आहे. मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या बीकॉम सत्र ५ ची परीक्षा आजपासून म्हणजेच गुरुवार, २६ ऑक्टोबर पासून सुरू होत आहे. विशेष म्हणजे या हिवाळी सत्रातील परीक्षेतील अचूकतेसाठी विद्यापीठ प्रशासनाने स्टिकर व ऑनलाईन उपस्थिती पद्धतीचा अवलंब केला आहे.

या परीक्षेला सर्व शाखांच्या तुलेनेने सर्वाधिक म्हणजेच ५९,९७८ विद्यार्थी प्रवेशित झाले आहेत. यामध्ये ३१,६९४ विद्यार्थी व २८, २८४ विद्यार्थिनी आहेत. या परीक्षा मुंबई विद्यापीठाच्या मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पालघर जिल्ह्यातील ४४९ परीक्षा केंद्रावर घेण्यात येत आहेत.

या परीक्षेची तयारी सर्व महाविद्यालयांनी केली आहे. विद्यार्थ्यांना मिळणारी परीक्षेची प्रवेशपत्रे, विविध महाविद्यालयातील परीक्षा केंद्रे याचा आढावा परीक्षा विभागाचे उपकुलसचिव नरेंद्र खलाणे यांनी घेतला आहे. टीआर महाविद्यालयाला परीक्षेचे साहित्य व उत्तरपत्रिका तसेच ऑनस्क्रीन मार्किंग पद्धत, स्टिकर व ऑनलाईन उपस्थिती पद्धतीचा आढावा उपकुलसचिव संतोष सोनावणे यांनी घेतला आहे.

(वाचा: Work Management Tips: ऑफिसच्या कामांचे उत्तम नियोजन करण्यासाठी ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा)

या सत्र परीक्षेचे पेपर डिजिटल इलेक्ट्रॉनिक पेपर डिलिव्हरी पद्धतीमार्फत ४४९ परीक्षा केंद्रांना पाठविण्यात आले आहेत. याचा आढावा उपकुलसचिव सुनील खतेले यांनी घेतला. या परीक्षेचे मूल्यांकन ऑनस्क्रीन मार्किंगद्वारे करण्यात येणार आहे.

अचूकतेसाठी स्टिकर व ऑनलाईन उपस्थिती पद्धत
मागील परीक्षेत काही विद्यार्थ्यांनी आसन क्रमांक व बारकोड चुकीचे लिहिले होते, यामुळे त्यांचे निकाल राखीव राहिले होते, नंतर ते जाहीर झाले. यावर उपाय म्हणून विद्यापीठाने या हिवाळी सत्रापासून विद्यार्थ्यांचे आसन क्रमांक, बारकोड व इतर माहिती असलेली पीडीएफ फाईल प्रत्येक परीक्षा केंद्रांना पाठविलेली आहे. ती फाईल परीक्षा केंद्राने डाऊनलोड करून विद्यापीठाने दिलेल्या स्टिकरवर प्रिंट करून विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेवर चिकटविली जाईल.

यावर क्यूआर कोड असल्याने विद्यार्थ्याची सर्व माहिती विद्यापीठास मिळेल व या कारणासाठी विद्यार्थ्यांचे निकाल राखीव राहणार नाहीत. तसेच विद्यार्थी परीक्षेत उपस्थित आहे का नाही यासाठी ऑनलाईन उपस्थिती पद्धत सुरू करण्यात येत आहे. परीक्षा केंद्र विद्यार्थ्याची उपस्थिती विद्यापीठाच्या ऑनलाईन उपस्थिती प्रोग्राममध्ये नोंदवली जाईल.यामुळे विद्यार्थी उपस्थित आहे का नाही ते तात्काळ विद्यापीठास समजेल.

(वाचा: Shivaji University Kolhapur Bharti 2023: कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात ‘या’ पदांची भरती; आजच करा अर्ज)

Source link

Mumbai University BCom Semester 5 ExamMumbai University Exam news 2023mumbai university newsमुंबई विद्यापीठ परीक्षा स्थगितमुंबई विद्यापीठ सत्र परीक्षा
Comments (0)
Add Comment